Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कुर्ला एल विभागातील नागरी समस्यांवर स्वप्नील जवळगेकर यांची प्रभारी सहाय्यक आयुक्तांशी भेट

mosami kewat by mosami kewat
August 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कुर्ला एल विभागातील नागरी समस्यांवर स्वप्नील जवळगेकर यांची प्रभारी सहाय्यक आयुक्तांशी भेट
       
मुंबई : कुर्ला एल विभागाच्या हद्दीतील विविध नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर यांनी प्रभारी सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हनुमान नगर, साबळे नगर, मदर डेअरी परिसर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. परिसरातील झाडांची होत असलेली कत्तल तात्काळ थांबवून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून नागरिकांची कामे वेळेत मार्गी लावावीत, अशीही मागणी जवळगेकर यांनी केली.

या मागण्यांवर प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित समस्यांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अश्विन आहिरे, अनिश वाघमारे, जितू गवई आणि सुजल भोसले उपस्थित होते.

Tags: kurlaMaharashtramumbaiPolitical
Previous Post

बल्लारपुरात स्वातंत्र्यदिनी १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

Next Post

बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादेचा प्रश्न वंचितने आणला ऐरणीवर; बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाला पत्र; संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home