Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात साजरा

mosami kewat by mosami kewat
August 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पुण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात साजरा
       
पुणे : वंचित बहुजन आघाडी, पुणे शहराच्या वतीने ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या लढ्याचा इतिहास, मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मंडल विजय दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ओबीसी आरक्षणासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लढ्याची भूमिका, तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी कशा लागू केल्या, तसेच ओबीसी आरक्षण चळवळीचा आजवरचा प्रवास याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

ओबीसी समाजाला सामाजिक न्याय, समान संधी आणि संविधानिक हक्क मिळवून देण्यासाठी मंडल आयोगाची अंमलबजावणी हा ऐतिहासिक टप्पा असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. आरक्षणाच्या माध्यमातून वंचित आणि मागास घटकांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याच्या लढ्याला अधिक बळ देण्याचे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमाला ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके, ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, वंचित बहुजन आघाडी पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, महिला अध्यक्ष अनिताताई चव्हाण, युवा आघाडी शहराध्यक्ष सागर आल्हाट यांच्यासह ओबीसी समाजातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: MaharashtraMandal Vijay DiwasPoliticalPrakash AmbedkarpunePune VBA Celebrates Mandal Vijay Diwas
Previous Post

कळमनुरीत वंचित बहुजन आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ अनोख्या पद्धतीने साजरा; बहुजन-ओबीसी समाज बांधवांशी साधला थेट संवाद

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात; सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळकटी देण्याचा निर्धार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी अनोखी भेट; यवतमाळ नगरपालिकेत डॉ. नीरज वाघमारे बसवणार मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन
बातमी

रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी अनोखी भेट; यवतमाळ नगरपालिकेत डॉ. नीरज वाघमारे बसवणार मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन

by mosami kewat
August 27, 2026
0

यवतमाळ : रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाचा विचार करत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपालिका गटनेते व नगरसेवक...

Read moreDetails
म्युच्युअल फंड, बँक मुदत ठेवी इत्यादी; विशेषतः सिनियर सिटीझन साठी !

म्युच्युअल फंड, बँक मुदत ठेवी इत्यादी; विशेषतः सिनियर सिटीझन साठी !

August 27, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा आणि राजकीय वास्तव

आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा आणि राजकीय वास्तव

August 27, 2026
लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे

लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे

August 27, 2026
विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

August 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home