Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात; सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळकटी देण्याचा निर्धार

mosami kewat by mosami kewat
August 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात; सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळकटी देण्याचा निर्धार
       
शिरड शहापूर : ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने तसेच राजेंद्र पातोंडे, प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी, हिंगोली जिल्ह्याच्या वतीने ७ ऑगस्ट रोजी ‘मंडल विजय दिवस – सामाजिक न्याय व समता दिन’ जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक यांच्या संपर्क कार्यालयात, शिरड शहापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बी. पी. मंडल आणि माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मंडल आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयाचे महत्त्व, संविधानिक सामाजिक न्याय, आरक्षणाचे संरक्षण, जातनिहाय जनगणना, वंचित समाजाचे प्रतिनिधित्व आणि संविधानिक हक्क या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी बोलताना समाजरत्न अनिल भाऊ कांबळे (माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक, वंचित बहुजन आघाडी, हिंगोली) यांनी सांगितले की, “मंडल आयोगाचा विजय हा केवळ आरक्षणाचा विजय नसून, भारतीय संविधानाने दिलेल्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचा विजय आहे. संविधानिक हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी सर्व वंचित, बहुजन व ओबीसी समाजाने संघटित राहून संघर्ष करणे ही काळाची गरज आहे.”

कार्यक्रमास समाजरत्न अनिल भाऊ कांबळे, यश राठोड (जिल्हा समन्वयक), श्यामसुंदर ठोंबरे, ॲड. सुकेश कांबळे (समतादूत, बार्टी), ॲड. सय्यद अलीम, यशवंत कांबळे, नारायण सूर्यतळ, हनीफ पठाण, आसिफ रजा, मारोती बोंगाने, सतीश पवार, विकी सूर्यतळ, इद्रिस पाशा, मोबिन पठाण, गजानन मुकाडे, बौद्धाचार्य कांबळे पी. एम., गजानन काळे, सखाराम अंभोरे, ज्ञानेश्वर काळे, यादवजी मोरे, काशिनाथ कबले, पवन दरवेश्वर, गोविंद पवार, संतोष गव्हरकर आणि जयदीप राठोड यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील विविध तालुके, सर्कल आणि गावांतील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी तसेच आरक्षण व संविधानाच्या संरक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Tags: MaharashtraMandal Vijay DiwasPolitical
Previous Post

पुण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात साजरा

Next Post

सत्ता जनतेची, नफा कुटुंबाचा? ट्रम्प यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न

Next Post
सत्ता जनतेची, नफा कुटुंबाचा? ट्रम्प यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न

सत्ता जनतेची, नफा कुटुंबाचा? ट्रम्प यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साकोलीत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘मंडल आयोग विजय दिवस’ उत्साहात साजरा
बातमी

साकोलीत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘मंडल आयोग विजय दिवस’ उत्साहात साजरा

by mosami kewat
August 8, 2026
0

साकोली (भंडारा) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाथोडे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात...

Read moreDetails
सत्ता जनतेची, नफा कुटुंबाचा? ट्रम्प यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न

सत्ता जनतेची, नफा कुटुंबाचा? ट्रम्प यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न

August 8, 2026
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात; सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळकटी देण्याचा निर्धार

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात; सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळकटी देण्याचा निर्धार

August 8, 2026
पुण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात साजरा

पुण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात साजरा

August 8, 2026
कळमनुरीत वंचित बहुजन आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ अनोख्या पद्धतीने साजरा; बहुजन-ओबीसी समाज बांधवांशी साधला थेट संवाद

कळमनुरीत वंचित बहुजन आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ अनोख्या पद्धतीने साजरा; बहुजन-ओबीसी समाज बांधवांशी साधला थेट संवाद

August 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home