Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सत्ता जनतेची, नफा कुटुंबाचा? ट्रम्प यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न

mosami kewat by mosami kewat
August 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सत्ता जनतेची, नफा कुटुंबाचा? ट्रम्प यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न
       

– संजीव चांदोरकर 

ये मिली सेकंडस एक्झॅक्टली कितने होते है और उनकी किंमत कितने मिलियन डॉलर्स होती है यह सर्फ डॉन (माने डोनाल्ड) जानता है ! 

विदूषकाला देशाचा प्रमुख केले की साऱ्या देशाची सर्कस होणार असे म्हणतात. राजकीय नेत्यांना निवडणुका जिंकण्यासाठी ज्या उद्योगपतींनी फंडिंग केले त्यांना हवीतशी आर्थिक धोरणे / निर्णय होतात हे तर आपण आपल्या देशात अनुभवत आहोत. 

पण एखादा बडा उद्योगपती स्वतःच राष्ट्राध्यक्ष झाला तर ? तो सारा देश / अर्थव्यवस्था आपल्या धंद्यासाठी / नफ्यासाठी वेठीला धरणार हे अपेक्षित आहे. आणि तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असला तर साऱ्या जगाची अर्थव्यवस्था !

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरून घेतलेले निर्णय उदा इराणवरील युद्ध किंवा युद्ध तहकुबी, आयात कर लावणे किंवा नंतर कमी करणे, पुढे ढकलणे इत्यादी यांचा अमेरिकेतील (आणि म्ह्णून जगातील ) खनिज तेल बाजार, कमोडिटी मार्केट, शेयर मार्केट, परकीय चलन मार्केट यांच्यावर ताबडतोब परिणाम होत आले आहेत.  

इराण युद्ध सुरू केल्यानंतर ट्रम्प यांनी किमान दहा वेळा आपले निर्णय लंबकासारखे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला नेले. तीच गोष्ट विविध देशांवर लावलेल्या आयात करांची. तीच गोष्ट देशांतर्गत निर्णयांची. बिनधास्त एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर घ्यावी इतके सहजपणे ते निर्णय बदलतात. 

(Trump Always Chickens Out – TACO) अशी टीका ट्रम्प यांच्यावर झाली खरी. पण आता हे स्पष्ट होत चालले आहे की ट्रम्प काही चिकन आऊट होत नव्हते. नाहीत. ते त्यांचे सजग निर्णय होते. त्यांच्या निर्णयाचे टायमिंग, वित्त बाजारातील चढउतार आणि काही संशयित मोठी डील्स याला दुजोरा देतात. 

डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळात, आपण एक पब्लिक ऑफिस सांभाळत आहोत नव्हे जगातील महाबलाढ्य  देशाचे राष्ट्रप्रमुख आहोत, याचा कोणताही मुलाहिजा न ठेवता…. स्वतःसाठी, कुटुंबाच्या मालकीच्या कंपन्यांसाठी लाखो डॉलर कमावत आहेत. 

अमेरिकेतील कमोडिटी मार्केट, शेअर मार्केट, सर्वच ऑनलाइन सट्टेबाज सदृश्य फायनान्शियल मार्केट पाऱ्यासारखी चंचल असतात. कोणतीही price sensitive information मिळाली की त्या प्लॅटफॉर्म वरील किंमती वेगाने वरखाली होतात. सामान्य गुंतवणूकदारांचा जीव वरखाली होतो. अनेक जण पॅनिक होऊन गुंतवणुकी तोट्यात विकून टाकतात. पण त्यातून मूठभर इन्सायडर गुंतवणूकदार व्यक्ती /  संस्था तुफान पैसे कमवतात. हे पुराव्यानिशी अमेरिकन मीडियात सिद्ध झाले आहे. 

आता ट्रम्प यांनी अजून पुढचा टप्पा गाठला आहे. त्यांचे सारे धोरणात्मक निर्णय, जे अमेरिकेवर नाही सर्व जगावर परिणाम करतात,  ते Truth Social या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर करत असतात. 

हा प्लॅटफॉर्म त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या असणाऱ्या Trump Media and Technology Corporation मालकीचा आहे. हे अजून एक अनाकलनीय ; अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्याच्या खाजगी हॅण्डलवरून औपचारिक निर्णय सार्वजनिक करतो ! 

आता ट्रम्प यांच्या या सोशल मीडिया कंपनीने एक ऑगस्ट पासून एक नवीन प्रॉडक्ट लाँच केले आहे data feed. या प्लॅटफॉर्मवर औपचारिक रित्या राष्ट्राध्यक्षांचा निर्णय जाहीर होण्याआधी काही मिली सेकंड्स आधी तो निर्णय हि डेटा फीड सेवा विकत घेणाऱ्याला मिळेल. मासिक फी आहे एक लाख डॉलर्स 

हेज फंड, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, अल्गो गुंतवणुकी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था त्यांची ग्राहक असणार आहेत. दुसऱ्या शब्दात या फिया न भरलेल्या गुंतवणूकदारांपेक्षा त्यांना काही मिली सेकंड आधी अशी माहिती मिळेल ज्यातून ते इतरांच्या आधी ऑर्डर्स एक्सिक्युट करू शकतात. (ज्यांना मार्केटबद्दल माहिती आहे त्यांना मिली सेकंदाचे महत्व माहित आहे). 

…..खुले आम इन्सायडर ट्रेडिंग ! खुद्द राष्ट्राध्यक्षाच्या देखरेखीखाली. आणि राष्ट्राध्यक्ष / कुटुंब त्याचे प्रत्यक्ष लाभार्थी ! 

मागच्या जानेवारीत राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ट्रम्प यांच्या कंपन्यांनी स्वतःची क्रिप्टो करन्सी काढली. स्वतःचा ब्रँड बनवून त्या ब्रॅण्डची घड्याळे , परफ्युम आणि चक्क बायबलची प्रत विक्रीला काढली. 

त्यांचे कुटुंब रियल इस्टेट उद्योगात होतेच. त्यांनी गेल्या दीड वर्षात सौदी अरेबिया, कतार, यूएई मध्ये मोठ्या रियल इस्टेटच्या डील केल्या आहेत. गाझा मधील नरसंहारावर आपण हळहळतो. तेथे रियल इस्टेट विकसित करण्याची ब्ल्यू प्रिंट तयार आहे 

डिसेंबर २०२४ मध्ये ट्रम्प कुटुंबाची संपत्ती २.४ बिलियन डॉलर्स होती. ती दीड वर्षात ७ बिलियन डॉलर्स झाली आहे. हे झाले ट्रम्प यांच्याबाबत. गेल्या दीड वर्षातील त्यांचे बिलियनर्स मित्रांचे आकडे माहित नाहीत. 

 “काही व्यक्ती भ्रष्ट असतात,  त्यांना बदलले की झाले” या ब्रेनवॉश मधून बाहेर येऊया. सिस्टीम तशी असते म्हणूनअशा भ्रष्ट व्यक्ती निपजतात, त्या सर्वोच्च स्थानपर्यंत पोचतात आणि कोणीही विरोध करत नाही, हे म्हणजे सिस्टीम. ती समजून घेऊया. 

नियमित पणे निवडणुका होऊन आपले जनप्रतिनिधी / आपल्यावर नक्की कोण राज्य करणार हे मतदार नागरिकच ठरवतात. त्यांनी पुढच्या निवडणुकणांमध्ये मते देताना पुन्हा ट्रम्प (किंवा तत्सम ) आणि त्यांना सिनेट / काँग्रेसमध्ये कोणताही विरोध न करणारे कणाहीन जनप्रतिनिधी (किंवा तत्सम ) निवडून जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे अशा चर्चा अमेरिकेत होत आहेत 

ही पोस्ट फक्त अमेरिकेसाठी आहे. त्याचा किंचितही संबंध भारताशी नाही. आपण काळजी घेण्याचे कारण नाही. आपले छान सुरु आहे. 


       
Tags: americadonald trampEconomicsMaharashtra
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात; सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळकटी देण्याचा निर्धार

Next Post

साकोलीत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘मंडल आयोग विजय दिवस’ उत्साहात साजरा

Next Post
साकोलीत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘मंडल आयोग विजय दिवस’ उत्साहात साजरा

साकोलीत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे 'मंडल आयोग विजय दिवस' उत्साहात साजरा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन
बातमी

खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन

by mosami kewat
September 18, 2026
0

नांदेड : खोब्रागडे नगर येथील अल्पवयीन पीडित बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला पोलीस...

Read moreDetails
विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न

विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न

September 18, 2026
जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल

जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल

September 18, 2026
संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

September 18, 2026
मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

September 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home