Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

साकोलीत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘मंडल आयोग विजय दिवस’ उत्साहात साजरा

mosami kewat by mosami kewat
August 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
साकोलीत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘मंडल आयोग विजय दिवस’ उत्साहात साजरा
       
साकोली (भंडारा) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाथोडे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात ७ ऑगस्ट हा ‘मंडल आयोग विजय दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर साकोली येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडी भंडारा (तालुका साकोली) यांच्या संयुक्त विद्यमाने मंडल आयोग विजय दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. 

७ ऑगस्ट १९९० हा भारतीय सामाजिक न्यायाच्या इतिहासातील अत्यंत सुवर्णमय दिवस मानला जातो. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान कै. विश्वनाथ प्रताप सिंह (व्ही. पी. सिंह) यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. या धाडसी निर्णयामुळे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीयांना (OBC) २७% आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला.

याप्रसंगी आयोजित सभेत वक्त्यांनी सांगितले की, काँग्रेस सरकारने प्रदीर्घ काळ मंडल आयोगाचा अहवाल अंमलात आणला नव्हता. मात्र, व्ही. पी. सिंह यांनी स्वतःच्या सरकारची पर्वा न करता सामाजिक न्यायाचे वचन पूर्ण केले. या निर्णयामुळे भाजप सरकारने आपला पाठिंबा काढून घेतल्याने व्ही. पी. सिंह यांचे सरकार पडले, तरीही त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या हक्काशी तडजोड केली नाही. 

तसेच केंद्रीय मंत्रीपद नाकारून बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणासाठी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून घेण्यात बजावलेली भूमिका अत्यंत मोलाची होती. या कार्यक्रमाला साकोली तालुक्यातील बहुसंख्येने ओबीसी बांधव व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

यामध्ये वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे यांच्यासह यादवराव गणवीर, अमित नागदेवे, जगदीश रंगारी, गणेश गजभिये, केवलराम उके, शिवप्रसाद मेश्राम, जोश्ना खोब्रागडे, प्रेमचंद खोब्रागडे, सरिता डोंगरे, पारधी मॅडम, खेमू मोटघरे, बबीता राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: MaharashtraMandal Vijay DiwasSakoli
Previous Post

सत्ता जनतेची, नफा कुटुंबाचा? ट्रम्प यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न

Next Post

८५० खासदारांची संसद : लोकशाहीचा विस्तार की जमावतंत्राचा प्रयोग?

Next Post
८५० खासदारांची संसद : लोकशाहीचा विस्तार की जमावतंत्राचा प्रयोग?

८५० खासदारांची संसद : लोकशाहीचा विस्तार की जमावतंत्राचा प्रयोग?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home