Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Pune : उद्या बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे धरणे आंदोलन!

mosami kewat by mosami kewat
October 7, 2025
in बातमी, सामाजिक
0
Pune : उद्या बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे धरणे आंदोलन!

Pune : उद्या बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे धरणे आंदोलन!

पुणे : बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी भारतीय संविधानाच्या प्रती, महापुरुषांच्या पुस्तकांची तसेच संविधान प्रस्ताविकेची विटंबना केल्याचा गंभीर आरोप होत असताना, या प्रकरणात तात्काळ कारवाईची मागणी करत वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर “सुनील वारे हटाव – बार्टी बचाव” या घोषवाक्याखाली बुधवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता समाजकल्याण कार्यालय, आगरकर नगर (पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागे, पुणे स्टेशन) येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

संविधान व महापुरुषांचा अपमान तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान या गंभीर घटनेविरोधात आंदोलनादरम्यान सुनील वारे यांची तात्काळ हकालपट्टी, निलंबन व बडतर्फीची मागणी करण्यात येणार आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व सागर आल्हाट (अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर) करणार असून, या प्रसंगी ॲड. अरविंद तायडे (अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर), अनिताताई चव्हाण (अध्यक्षा, वंचित बहुजन महिला आघाडी, पुणे शहर), चैतन्य इंगळे (अध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर), विशाल कसबे (अध्यक्ष, माथाडी कामगार व ट्रान्सपोर्ट युनियन, पुणे शहर) आणि पद्यश्री साळवे (अध्यक्ष, रेल्वे कामगार आघाडी, पुणे शहर) उपस्थित राहणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीने सर्व संविधानवादी, बहुजनवादी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Tags: BARTIbooksConstitutionDr Babasaheb AmbedkarMaharashtrapuneVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढाईला यश! दंडाची रक्कम परत, ‘री-इंटर्नल’ परीक्षा रद्द; ‎व्ही.एन.पाटील लॉ महाविद्यालयाचा निर्णय

Next Post

इंडिया आघाडीने जाणीवपूर्वक दलित नेतृत्वाला डावलले : लोकसभा निवडणुकीत वंचितला दूर ठेवून भाजपची सत्ता आणली; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निशाणा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Akola : सुजात आंबेडकरांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचा निर्धार
बातमी

Akola : सुजात आंबेडकरांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचा निर्धार

by mosami kewat
November 13, 2025
0

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा अकोला येथे चर्चा दौरा सुरू आहे. अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी...

Read moreDetails
“बेगूर कॉलनी”चा कर्नाटकात शंभरीचा टप्पा; हिंदी आवृत्ती “बी.आर. आंबेडकर मैदान”चे चित्रपटाचे मुंबईत पोस्टर अनावरण!

“बेगूर कॉलनी”चा कर्नाटकात शंभरीचा टप्पा; हिंदी आवृत्ती “बी.आर. आंबेडकर मैदान”चे चित्रपटाचे मुंबईत पोस्टर अनावरण!

November 13, 2025
जनधन खात्यांचा प्रश्न : खाती नाही, अर्थविश्व ‘डॉर्मंट’ आहे!

जनधन खात्यांचा प्रश्न : खाती नाही, अर्थविश्व ‘डॉर्मंट’ आहे!

November 13, 2025
शिवसेना पदाधिकारी शरद कोळीकडून शेतकऱ्याची शेती बळकावण्याचा प्रयत्न: पीडितांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

शिवसेना पदाधिकारी शरद कोळीकडून शेतकऱ्याची शेती बळकावण्याचा प्रयत्न: पीडितांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

November 13, 2025
ऐरोलीत जातीय मानसिकतेतून बौद्ध तरुणावर अत्याचार; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली पीडितांची भेट

ऐरोलीत जातीय मानसिकतेतून बौद्ध तरुणावर अत्याचार; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली पीडितांची भेट

November 13, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home