Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

mosami kewat by mosami kewat
June 12, 2026
in बातमी, सामाजिक
0
बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न
       

बाळापूर : भारतीय बौद्ध महासभा, बाळापूर तालुक्याच्या वतीने स्वाभिमानी सप्ताहानिमित्त तथा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त मोरगाव सादिजन येथे आयोजित करण्यात आलेले पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. दिनांक 12 मे रोजी शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस  नंदकुमार डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा बाळापूर तालुकाध्यक्ष राहुल इंगळे होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शिबिराचे उपाध्याय पूज्य भंते राजज्योती यांच्या उपस्थितीत याचना करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. याच वेळी पाच गावांमध्ये आयोजित उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरांचेही उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात तब्बल 95 बाल श्रामणेरांनी सहभाग नोंदविला. केंद्रीय शिक्षक म्हणून विलास बावस्कर तसेच भंते धम्मदीप, भंते धम्मदूत आणि भंते सूर्यज्योती यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. शिबिरादरम्यान अनेक दानदात्यांनी भोजन, फलाहार, अल्पोपहार आणि पाणीदान करून सहकार्य केले.

Also Read : मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

दररोज सकाळी गावातून मंगल मैत्री फेरी काढण्यात येत होती. त्यामुळे संपूर्ण गावात आनंदमय आणि धम्ममय वातावरण निर्माण झाले. तसेच दररोज सायंकाळी पूज्य भंते राजज्योती यांचे धम्मप्रवचन आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुकाध्यक्ष राहुल इंगळे, सरचिटणीस सागर अनिल निखाडे, तथागत नवयुवक मित्र मंडळ, सुजाता महिला संघ तसेच समस्त बौद्ध पंच मंडळ, मोरगाव सादिजन यांनी विशेष परिश्रम घेतले.

समारोप कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे अकोला जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे उपस्थित होते. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा इंदुताई मेश्राम, जिल्हा सरचिटणीस प्रज्ञाताई इंगळे, महिला तालुकाध्यक्ष दिपाली खंडारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपासिका प्रशिक्षण शिबिरासाठी शेगावकर ताई, साखरकर ताई, साबळे ताई आणि शिरसाट ताई यांनी केंद्रीय शिक्षिका म्हणून मार्गदर्शन केले.

Also Read : अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि ‘युद्ध’ नावाचा कॉर्पोरेट धंदा

याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा आम्रपाली खंडारे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी तसेच तालुका व जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. शिबिराचा लाभ परिसरातील हजारो उपासक-उपासिकांनी घेतला. शेवटच्या दिवशी सामुदायिक भोजनदानाचे आयोजन करण्यात आले. तसेच सर्व शिबिरार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करून शिबिराचा समारोप करण्यात आला. 


       
Tags: BalapurMaharashtraPrakash Ambedkar
Previous Post

कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

Next Post

मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

Next Post
मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home