Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

mosami kewat by mosami kewat
February 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा

       

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दबावाखाली देशाचे सार्वभौमत्व आणि परराष्ट्र धोरण गहाण ठेवले आहे. भारत आता अमेरिकेचे ५१ वे राज्य असल्यासारखा वागत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या गंभीर मुद्द्यांवरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली असून, २ मार्च रोजी मुंबईत मोठ्या आंदोलनाची हाक देखील दिली आहे. नागपूर येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. प्रकाश आंबेडकर बोलत होते.

यावेळी त्यांनी संरक्षण करार, कृषी धोरण आणि परराष्ट्र संबंधांवरून सरकारवर प्रश्न केले. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अमेरिका, रशिया आणि इराण यांच्यातील संघर्षात भारताने अमेरिकेच्या आदेशांपुढे शरणागती पत्करली आहे. भारताचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आता संपले असून, रशिया आणि इराणच्या विरोधात अमेरिकेची जी भूमिका असेल, तीच भारताला स्वीकारावी लागत आहे. अमेरिकन वस्तूंना दिलेला शुल्क-मुक्त प्रवेश आणि कृषी क्षेत्र खुले केल्यामुळे भारतीय शेतकरी देशोधडीला लागेल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. (prakash ambedkar)

११४ राफेल विमानांच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, ज्या कंपनीकडून आपण राफेल खरेदी करत आहोत, ती आता अमेरिकन कंपनीच्या मालकीची झाली आहे. जर फ्रान्सने ‘सोर्स कोड’ दिला नाही आणि अमेरिकेने परवाना नाकारला, तर १ लाख १० हजार कोटी रुपये खर्च करून आपण केवळ ‘लोखंड’ खरेदी केले आहे, असे म्हणावे लागेल. रशियाने सुखोई विमानांचे तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शवली असतानाही, तो प्रस्ताव का नाकारला? असा सवाल त्यांनी केला. (prakash ambedkar)

पुढे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी आरोप करत म्हटले की, अमेरिकेतील ‘एपस्टीन फाईल’मध्ये भारताच्या तीन व्यक्तींची नावे समोर येत आहेत, ज्यात पंतप्रधानांचे नाव असल्याचे बोलले जात आहे. या फाईलमुळे देशाच्या प्रतिमेला जागतिक स्तरावर धक्का बसला असून, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि एम.के. स्टालिन यांसारख्या विरोधी नेत्यांनी केवळ संसदेतच नव्हे, तर रस्त्यावर उतरून या मुद्द्यांवर आवाज उठवावा, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रमुख मागण्या आणि इशारा:

१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा.

२) रशियाचा विमान तंत्रज्ञानाचा प्रस्ताव का नाकारला, याचे उत्तर द्यावे.

३) २ मार्च रोजी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.


       
Tags: DefenseDealEpsteinFilesGeopoliticsIndiaForeignPolicyindiandemocracyIndianPoliticsIndiaUSRelationsMumbaiProtestNarendraModiNationalSovereigntyOppositionVoicesprakashambedkarRafaleDealVanchitbahujanaghadi politics
Previous Post

जालना : घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

Next Post

अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

Next Post
अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home