अकोला : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या अकोला येथील कार्यालयात संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामीण भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाल ढोरे यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबांनी दिलेल्या स्वच्छता, शिक्षण, समाजसुधारणा व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजात समता, बंधुता आणि सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहनही करण्यात आले. (Sant Gadge Baba Jayanti)
या कार्यक्रमाला जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे, पश्चिम शहर महासचिव गजानन गवई, मनोहर बनसोड, सुशील मोहोड, नगरसेवक पराग गवई, शेख शमशु, रुग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ, विकास सदांशिव, बंडू ढोरे, सुमित नवलकर, अमित निमकर्डे, बंडू भदे, प्रदीप पळसपगार, डॉ. अशोक मेश्राम, आतिश शिरसाट, संतोष कीर्तक, डॉ. शंकरराव राजुस्कर, प्रकाश राणे, सरला मेश्राम, संजय बुध, सुयोग आठवले यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गजानन गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन सुशील मोहोड यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...
Read moreDetails






