Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

mosami kewat by mosami kewat
August 5, 2026
in Uncategorized
0
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  
       

– संजीव चांदोरकर 

“आर्टिफिशियल इंटेलिजन्स”ची चर्चा आता नवीन नाही राहिली. तुम्ही ज्या क्षेत्राशी सबंधित आहात त्या क्षेत्रात एआय काय इम्पॅक्ट करु शकते याचे अंदाज बांधत चर्चा होणे स्वाभाविक आहे. आयटी क्षेत्रात काय होईल, एकूण अर्थव्यवस्थेत किती बेरोजगारी होऊ शकते इत्यादी. 

एआय बद्दल दुसऱ्या चर्चा घडत आहेत त्या अमेरिका स्थित एआय कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती मध्ये फुगा (ॲसेट बबल) तयार झाला आहे का? असे असेल तर तो अचानक फुटेल का ? अमेरिकेतील २००२ मधील डॉट कॉम, २००८ मधील सबप्राइम वित्तीय अरिष्ट सारखे मोठे अरिष्ट येऊन कोसळेल का ? 

अमेरिकेतील शेअर बाजाराचा परिणाम भारतासकट सर्वच शेअर बाजारांवर नेहमीच होत असतो. त्यामुळे असे काही घडले तर भारताच्या शेयर बाजारावर काय परिणाम होईल? इत्यादी 

भारतात गेल्या काही वर्षात अनेक मध्यमवर्गीय शेयर मार्केटमध्ये आपल्या बचती गुंतवू लागल्या आहेत. आधीच्या सर्व अरिष्टात त्यांची संख्या एवढी कधीच नव्हती. त्यामुळे तेवढा हल्लकल्लोळ माजला नव्हता. आता परिस्थिती वेगळी आहे. शेयर मार्केट अरिष्ट लाखो गुंतवणूकदार कुटुंबाना लपेटू शकते. त्यामुळे त्यांनी किमान माहिती ठेवली पाहिजे.

अमेरिकेतील एआय कंपन्यांचे शेअर्स वरखाली होत आहेतच पण पहिली विकेट पडली ती दक्षिण कोरियाच्या एआय कंपन्याची आणि म्हणून तेथील एकूणच शेयर मार्केटची.

मागच्या आठवड्यात KOSPI (जसा आपला सेन्सेक्स) हा दक्षिण कोरियन निर्देशांक त्याच्या ऐतिहासिक उंचीवरून तीन सत्रात ४० पेक्षा जास्त टक्क्यांनी खाली आला. ( गेल्या दोन दिवसांत तो काहीसा सावरला आहे). गेल्या वर्षभरात KOSPI १८० टक्क्यांनी वधारला यावरुन तेथे काय धमाल सुरू असेल याचा अंदाज येईल. 

निर्देशांक वधारला याचा अर्थ असा नाही की सर्व किंवा बहुसंख्य कंपन्यांचे शेअर्स त्या प्रमाणात वधारले. 

Samsung आणि SK Hynix या फक्त दोन कंपन्यांचा KOSPI मधील वाटा ५० टक्के आहे. (अमेरिकेत देखील मुठभर एआय कंपन्यांच्या शेयरमुळे शेयर मार्केट ऐतिहासिक उंचीवर आहे). वरील दोन कोरियन कंपन्यांचे शेअर्स २५ टक्के आणि ३० टक्क्यांनी तीन दिवसात खाली आले होते. त्या तीन दिवसात तीन वेळा सर्किट ब्रेकर लावले गेले होते. काही लाख कोटी बाजारमूल्य स्पिरीट सारखे उडाले. 

या नाट्यपूर्ण कोसळण्याला अनेक कारणे सांगितली जात आहेत. पण एक महत्वाचे कारण ठरले ते मे महिन्यात वरील फक्त दोन कंपन्यांच्या शेयरवर आधारित Exchange Traded Fund (ETF) मध्ये गुंतवणूकदार कर्ज काढून गुंतवणूक करू लागले. 

अडाणीपणाची हद्द झाली. मुळात ETF ही संकल्पना मोठ्या बास्केटची आहे. ज्यामुळे risk diversification होऊ शकते. 

अर्थात हे नवीन प्रॉडक्ट आणि प्रणाली तेथल्या शेयर मार्केटच्या नियामक मंडळाच्या परवानगीने सुरू झाली होती. 

याचा फायदा घेत अनेक गुंतवणूकदारांनी ब्रोकरेज हाऊसेस कडून कर्जे काढून त्यावर या दोन कंपन्यांच्या शेअर्स वर सट्टा खेळावयास सुरुवात केली. या ETF प्रॉडक्ट मध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा वाटा ९० टक्के होता. 

आपल्या बघती घालून शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे आणि कर्ज काढून गुंतवणूक करणे हे भिन्न प्रकार आहेत. कर्ज काढून तुम्ही ज्यावेळी शेअर्स मध्ये गुंतवणूक करता त्यावेळी ते शेअर्स कर्ज देणाऱ्या ब्रोकरेज हाऊसकडे कर्जाला सुरक्षा म्हणून गहाण ठेवले जातात. 

आणि असा लिखित करार असतो की जर शेअर्सच्या किंमती घसरल्या आणि दिलेले कर्ज धोक्यात आले तर एकतर ब्रोकर गुंतवणूकदाराला अधिकचे पैसे भरायला सांगतो. त्याला मार्जिन कॉल असे म्हणतात. किंवा तुम्ही भरू शकला नाहीत तर ब्रोकर त्याच्याकडे असलेले शेअर्स विकून कर्जाच्या परतफेड करून घेऊ शकतो. दक्षिण कोरियात नेमके हेच घडले. फक्त काही दिवसात दक्षिण कोरियातील शेयर मार्केट कोसळण्यामध्ये याचा मोठा वाटा आहे.

वरील दोन कंपन्यांच्या ETF मधील गुंतवणूकदारांमध्ये त्या देशातील तरुणांचे प्रमाण खूप मोठे आहे. पुरेसे उत्पन्न नाही, त्यामुळे घर घेता येत नाही, आर्थिक स्थिरता नाही, म्ह्णून लग्ने होत नाहीत …यामुळे झटपट पैसे कोठून मिळतील याच्या शोधात तेथील तरुण पिढी असते. शेयर मार्केट , ETF मध्ये त्यांचा मोठा सहभाग त्यातून येत असतो 

जेवढे अरिष्ट वाढेल तेवढे वित्त भांडवल अविवेकी होत जाणार आहे. सर्व गुंतवणूकदारांना आपल्या प्रभाव क्षेत्रात ओढून घेणार आहे. त्यासाठी अजून नवीन प्रोडक्ट्स शोधून काढली जाणार आहेत. ते गुंतवणूकदारांना गुंतवणूक आणि सट्टेबाजी यातील सीमारेषा समजली पाहिजे. 

भारतातील गुंतवणूकदारांसाठी , विशेषतः तरुण वर्गासाठी: तुमची पैशाची तंगी खरी आहे. पण झटपट पैशाच्या मागे लागू नका. आपली जोखीम क्षमता बघून सट्टेबाज सदृश्य शेयर बाजारात गुंतवणुकी करा. कर्जे काढून अशा गुंतवणुकी अजिबात करू नका. अमेरिकेन आणि म्हणून जागतिक शेयर बाजारात लाल बावटे लागले आहेत. त्याबद्दल वाचा. समजून घ्या. 


       
Tags: AIArtificial Intelligence
Previous Post

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

Next Post

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

Next Post
नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home