Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ISRO आणि DRDO च्या खाजगीकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; देश विकून व्याज भरणार का ? 

mosami kewat by mosami kewat
August 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ISRO आणि DRDO च्या खाजगीकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; देश विकून व्याज भरणार का ? 
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय कडक शब्दात हल्लाबोल केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील राष्ट्रीय संस्थांमध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याच्या सरकारच्या धोरणावर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधताना म्हटले आहे की, “स्वतः अमेरिकेच्या तालावर नाचत आहात आणि गुजराती उद्योगपतींच्या दावणीला बांधले गेले आहात. पण, किमान ISRO आणि DRDO या राष्ट्रीय संस्थांना तरी सोडून द्या!”

ॲड. आंबेडकर यांनी पुढे म्हटले आहे की, “निवडणुका जिंकण्यासाठी कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी आणि देणग्या घेतल्या, आणि आता देश विकून त्याचे व्याज भरणार आहात का?” 

DRDO ची क्षेपणास्त्र निर्मिती तंत्रज्ञान (Technology Transfer) खाजगी संरक्षण कंपन्यांना देण्याचा निर्णय आणि ISRO द्वारे रॉकेट निर्मितीचे काम टप्प्याटप्प्याने खाजगी क्षेत्राकडे सोपवून संशोधन आणि नव्या स्पेस तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याचे वृत्त समोर आले आहे. या निर्णयावरूनच प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर देश विकल्याचा गंभीर टीका केली आहे. 

संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञानातील खाजगी सहभागामुळे देशाच्या सुरक्षेवर आणि स्वावलंबनावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देत वंचित बहुजन आघाडीने या धोरणाचा तीव्र निषेध केला आहे.

Tags: DrdoISROnarendra modiPoliticalPrakash AmbedkarTechnologyVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आंदोलक आदिवासी भगिनींनी नीरज वाघमारे यांच्या मनगटावर बांधली ‘संघर्षाची राखी’!

Next Post

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत व शासकीय नोकरी द्या : सागर भवते

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 
बातमी

संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

by mosami kewat
September 18, 2026
0

भिवंडी : भाजपकडून महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या नावाने राजकीय घोषणांचा डंका पिटला जात असताना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातून समोर आलेल्या...

Read moreDetails
मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

September 18, 2026
समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता काबीज करणे गरजेचे – प्रा. नागोराव पांचाळ

समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता काबीज करणे गरजेचे – प्रा. नागोराव पांचाळ

September 18, 2026
Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते

Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते

September 17, 2026
जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

September 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home