वंचित बहुजन आघाडीचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन
तिवसा : मोर्शी तालुक्यातील भांबोरा गावातील शेतशिवारात २७ ऑगस्ट रोजी शेतकरी चरणदास इखे यांच्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे इखे यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. यावेळी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला वनविभागाच्या वतीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, मोर्शी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
अस्मानी-सुलतानी संकटांनी आधीच त्रस्त असलेल्या शेतकरी कुटुंबावर आता वाघाच्या हल्ल्यामुळे मोठे संकट ओढवले आहे. भांबोरा परिसरासह तिवसा तालुक्यातील करजगाव, वरूडा, दापोरी, जावरा, फत्तेपूर तसेच इतर गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित गावांना भेटी देऊन ग्रामस्थांची बैठक घ्यावी, वाघाच्या संभाव्य हालचालींबाबत नागरिकांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन करावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
Also Read : ISRO आणि DRDO च्या खाजगीकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; देश विकून व्याज भरणार का ?
निवेदन सादर करताना जिल्हा महासचिव सागर भवते यांच्यासह तिवसा तालुका अध्यक्ष मनीष खरे, मोर्शी तालुका अध्यक्ष अमोल सरवटकर, प्रवीण निकाळजे, भुजंग वावरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
भांबोरा येथे झालेल्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्याबाबत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मोर्शी व तिवसा तालुक्यातील नागरिकांनी वनविभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नयेत, असे आवाहन सागर भवते यांनी केले.
जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल
Asian Games 2026, India into Semifinal : आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी देत उपांत्य फेरीत धडक...
Read moreDetails






