Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आंदोलक आदिवासी भगिनींनी नीरज वाघमारे यांच्या मनगटावर बांधली ‘संघर्षाची राखी’!

mosami kewat by mosami kewat
August 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आंदोलक आदिवासी भगिनींनी नीरज वाघमारे यांच्या मनगटावर बांधली ‘संघर्षाची राखी’!
       

आंदोलनस्थळी रंगला रक्षाबंधनाचा हृदयस्पर्शी सोहळा; मोठा भाऊ म्हणून प्रत्येक संघर्षात तुमच्या पाठीशी उभा राहीन — डॉ. नीरज वाघमारे

यवतमाळ : एका बाजूला आपल्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेला संघर्ष… दुसऱ्या बाजूला रक्षाबंधनाचा भावनिक सण… घरापासून आणि आपल्या भावांपासून दूर आंदोलनस्थळी ठिय्या मांडून बसलेल्या आदिवासी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर त्या दिवशी संघर्षाची जिद्द होती; पण मनाच्या एका कोपऱ्यात आपल्या भावाला राखी बांधता न आल्याची हुरहूरही होती.

याच आंदोलनस्थळी रक्षाबंधनाच्या दिवशी मात्र एक अत्यंत भावूक आणि अविस्मरणीय क्षण घडला. आंदोलक आदिवासी भगिनींनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपरिषदेचे नगरसेवक व गटनेते डॉ. नीरज वाघमारे यांच्या मनगटावर राखी बांधली आणि आंदोलनाच्या मंडपातच एका नव्या भावा-बहिणीच्या नात्याची वीण गुंफली.

मागील पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रभर आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्क व अधिकारांसाठी तीव्र आंदोलन करीत आहेत. शासनासोबत वारंवार चर्चा होऊनही आदिवासी विद्यार्थ्यांच्या नोकरभरतीसह प्रलंबित प्रश्नांना अपेक्षित न्याय मिळालेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आपले घरदार सोडून आंदोलनस्थळी ठामपणे संघर्ष करीत आहेत.

रक्षाबंधनासारख्या बहिण-भावाच्या अतूट नात्याचा सण आला, तरी या विद्यार्थिनी आपल्या घरी परतल्या नाहीत. भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापेक्षा आपल्या समाजाच्या हक्कांसाठी संघर्षाच्या मैदानात थांबणे त्यांनी निवडले. या त्यागाने आंदोलनस्थळी उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून गेले.

यावेळी डॉ. नीरज वाघमारे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या संघर्षाला पाठिंबा व्यक्त केला. विद्यार्थिनींशी बोलताना त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले— “आज तुम्ही आपल्या हक्कांसाठी घरापासून दूर आहात. आपल्या सख्ख्या भावाला राखी बांधण्यासाठीही घरी जाऊ शकलेल्या नाहीत. पण आजपासून स्वतःला एकटे समजू नका. मोठ्या भावाच्या भूमिकेतून, आयुष्यातील आणि या न्यायाच्या संघर्षातील प्रत्येक प्रसंगात एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.”

या शब्दांनी वातावरण क्षणभर भावूक झाले. त्यानंतर आंदोलक भगिनींनी मोठ्या उत्साहाने ‘नीरज भाऊंना’ राख्या बांधल्या, मिठाई भरवली आणि “आज आम्हाला आणखी एक भाऊ मिळाला” अशी भावना व्यक्त केली.

ज्या मंडपात काही क्षणांपूर्वी मागण्यांसाठी घोषणा आणि संघर्षाचा आवाज घुमत होता, त्याच मंडपात रक्षाबंधनाच्या निमित्ताने मायेचा, आपुलकीचा आणि बहीण-भावाच्या नात्याचा ओलावा पसरला. मनगटावर बांधलेला तो धागा केवळ राखीचा नव्हता; तो होता विश्वासाचा, आपुलकीचा आणि न्यायाच्या लढ्यात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याच्या वचनाचा धागा.

घरापासून दूर असलेल्या आंदोलक भगिनींसाठी हा रक्षाबंधन सोहळा विशेष ठरला. आंदोलनाचा मंडपच काही काळासाठी त्यांचे माहेर बनला आणि संघर्षातील सहकारीच त्यांचे कुटुंब झाले. त्यामुळे हा रक्षाबंधन सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपरिषदेचे नगरसेवक व गटनेते डॉ. नीरज वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश भानवे, शहर उपाध्यक्ष अरविंद दिवे, शहर उपाध्यक्ष उत्तम कांबळे, शहर महासचिव विलास वाघमारे, तसेच मोठ्या संख्येने आंदोलक विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: MaharashtraRakshabandhanVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आरएसएस-भाजपचा आरक्षण संपवण्याचा कट; केवळ आंबेडकरवादी पक्षच हे रोखू शकतात: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात

Next Post

ISRO आणि DRDO च्या खाजगीकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; देश विकून व्याज भरणार का ? 

Next Post
ISRO आणि DRDO च्या खाजगीकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; देश विकून व्याज भरणार का ? 

ISRO आणि DRDO च्या खाजगीकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल ; देश विकून व्याज भरणार का ? 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 
बातमी

संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

by mosami kewat
September 18, 2026
0

भिवंडी : भाजपकडून महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या नावाने राजकीय घोषणांचा डंका पिटला जात असताना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातून समोर आलेल्या...

Read moreDetails
मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

September 18, 2026
समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता काबीज करणे गरजेचे – प्रा. नागोराव पांचाळ

समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता काबीज करणे गरजेचे – प्रा. नागोराव पांचाळ

September 18, 2026
Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते

Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते

September 17, 2026
जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

September 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home