Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले ‘भूमिका’ नाटकाचे कौतुक

Akash Shelar by Akash Shelar
May 13, 2026
in बातमी
0
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले ‘भूमिका’ नाटकाचे कौतुक
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : ‘भूमिका’ नाटकातील संवादातून संविधानिक मूल्यांची पेरणी

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच ‘भूमिका’ या नाटकाचा प्रयोग पाहिला असून, या नाटकावर त्यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे. या नाटकात मांडलेले संविधानिक विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवी दृष्टिकोनाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत.

ॲड. आंबेडकरांनी म्हटले की, “नुकतंच ‘भूमिका’ नावाच्या नाटकाचा प्रयोग पाहिला. क्षितिज पटवर्धन लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित, श्रीपाद पद्माकर निर्मित आणि सचिन खेडेकर यांनी अभिनय केलेलं हे नाटक. संविधान, संविधानिक मूल्य, विविध विचार प्रवाहांचा पगडा असणाऱ्या व्यक्तीं सोबतचा (अगदी झेन जी पिढी सोबतचा) सजग परंतु, त्यांना न दुखवता विचार करायला लावणारा संवाद. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाती, धर्माच्या, प्रतिमा पूजनाच्या पलीकडे घेऊन जाऊन त्यांच्या माणूसपणाच्या व्यापक विचारांची मांडणी हे नाटक करते. आताच्या सर्वच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय गुंतागुंतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेले वैचारिक भंजाळलेपण थोडे तरी दूर करण्याचा प्रयत्न हे नाटक करते.

क्षितिज पटवर्धन सारख्या एका तिशी ओलांडलेल्या तरुणाने हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय चार वर्षांचा अभ्यास करून अडीच तासांमध्ये मांडण्याचा कष्टपूर्वक प्रयत्न केला आहे. आपल्याला मानवीय संविधानिक मूल्यांच्या आधारावर बदल हवाय तर ‘भूमिका’ घेणे महत्त्वाची आहे. भूमिका घेतल्याने काय सोडावे लागते? कशाचा आग्रह धरावा लागतो? त्यामुळे काय सोसावे लागते? त्यासाठी प्रत्येकाचा कसा कस लागतो? परिस्थिती समोर शरणागती कशी घेतो? या सर्वातून जेव्हा माणूस तगतो तेव्हा काय होते? याची मांडणी कमालीच्या ताकदीने क्षितिजने केली आहे. तर चंद्रकांत कुलकर्णी सारख्या मराठी रंगभूमीवर गेली २५ वर्षे त्या-त्या काळातील सामाजिक नाटके देणाऱ्या दिग्दर्शकाने हे नाटक आताचा काळ लक्षात घेऊन उभे केले आहे.

सचिन खेडेकर सारख्या सामाजिक भान असलेल्या उत्तम नटाने ही भूमिका वैचारिक, भावनिक तसेच राजकीय अर्थ नव्हे भावार्थ लक्षात ठेवून उठवली आहे. यात त्यांच्या अभिनयाचा ठसा नव्हे तर एका भारतीय नागरिकत्वाचा ठसा त्यांनी उठवलेला आहे. आणि म्हणूनच त्यांच्या अभिनयात कुठलाही अभिनिवेश नव्हता, तर ते तुम्ही-आम्ही आहोत असेच वाटते. हे आम्हाला काय सांगणार? असे ज्यांना वाटते, त्यांनी हे नाटक आधी आवर्जून पाहायला हवे आणि नंतरच त्यावर भाष्य करायला हवे. अर्थात दोन तासांत बाबासाहेबांच्या विचारांचा आणि त्याच्या प्रभावाचा इतका मोठा पट उलगडणे शक्य नाहीय.

पण तरीही एका सोप्या कथानकामध्ये याची गुंफण केल्याने त्यावरून मोठा पट उलगडतो तो प्रत्येकाच्या डोक्यात आणि मनात !!! खूप न हसवणारे मात्र मनातल्या मनात एक प्रकारच्या गुदगुल्या करणाऱ्या या नाटकाचा १२६ वा प्रयोग होता. या प्रयोगाला येण्याचा आग्रह नाटकाचे निर्माते श्रीपाद पद्माकर यांनी केला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार ! सर्वांनी आवर्जून हे नाटक बघावे !”


       
Tags: BHUMIKAKshitij patwardhannatakPrakash Ambedkarsachin khedekarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

Next Post

देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !

Next Post
देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !

देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश
बातमी

जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

by mosami kewat
August 24, 2026
0

नांदेड : जयभीम नगर येथे मागील अनेक दिवसांपासून पाईपलाईन खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या समस्येची...

Read moreDetails
पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

August 24, 2026
पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 24, 2026
देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

August 24, 2026
Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार - राजेंद्र पातोडे

Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार – राजेंद्र पातोडे

August 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home