Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरोधात ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

mosami kewat by mosami kewat
July 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरोधात ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
       

मुंबई : विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आला याचा निषेध आहे आणि शासनाचा विरोध करण्याचं महाराष्ट्राने सुरुवात केलेली आहे. यापुढे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होऊ नये, छर्रे, गोळ्या, अश्रुधुर चालवू नये यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने या बंद मध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलताना केले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, ज्या राजकीय पक्षांनी अजून भूमिका घेतल्या नाहीत त्यांनाही आम्ही असा आव्हान करत आहोत की, हा राजकीय प्रश्न नाही तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे म्हणून जे भाजपच्या विरोधात आहेत अशा त्या सर्व राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावं. (Maharashtra bandh)

दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आला, याचा निषेध आहे. शासनाच्या या कृत्याचा विरोध करण्याला महाराष्ट्राने सुरुवात केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी आवाहन करत म्हटले की, यापुढे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होऊ नये, छर्रे,  गोळ्या, अश्रुधुर चालवू नये, यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे. 

ज्या राजकीय पक्षांनी अजून भूमिका घेतल्या नाहीत, त्यांनाही आम्ही असा आवाहन करत आहोत की, हा राजकीय प्रश्न नाही, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. म्हणून जे भाजपच्या विरोधात आहेत, अशा त्या सर्व राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे. असे आंबेडकर यांनी म्हटले.

ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले की, टेरोटोरिआ आर्मी ही स्टँडबाय वरती ठेवण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर मध्ये रिझर्व पोलिस फोर्स  ठेवण्यात आला आहे त्याला सुद्धा स्टँडबाय ठेवून एअरलिफ्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Maharashtra bandh)

या लाठी हल्ल्याचा निषेध करताना ते म्हणाले की,  जो लाठी हल्ला झाला त्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंतर मंतर वरती एकही विद्यार्थी दिसू नये असे आदेश दिले होते. त्या आदेशाला धरुनच अमानुष अत्याचार विद्यार्थ्यांवर करण्यात आला या अत्याचाराचा निषेध आहे.


       
Tags: MaharashtraMaharashtra BandhmumbaiNeet ExamNEET Paper LeakPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

शेवगावात जंतर-मंतर आंदोलनाला पाठिंबा; क्रांती चौकात रास्ता रोको

Next Post

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

Next Post
२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

२३ जुलैच्या 'महाराष्ट्र बंद'मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home