Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
August 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन
       
नांदेड : नांदेड-जालना समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या नांदेड तालुक्यातील पिंपळगाव कोरका व नाळेश्वर येथील शेतकऱ्यांना योग्य मोबदला व न्याय मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतकरी नेते संतोष गव्हाणे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे, जिल्हा महासचिव दीपक मगर, नगरसेवक कुलदीप राक्षसमारे, नगरसेवक ॲड. बिलाल शेख, के. ए. वने, प्रा. प्रल्हाद हिंगोले, धाराजी इंगोले, वाढवे सर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व बाधित शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

भूसंपादनाच्या मोबदल्याचे फेरमूल्यांकन करून शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. तसेच २४ डिसेंबर २०२५ रोजीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रद्द अथवा बदल ठरलेले निवाडे रद्द करून त्यानुसार फेरमूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.०२/अ, दिनांक २४ जानेवारी २०२३ तसेच २१ जानेवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार जमिनीचे मूल्यांकन करण्यात यावे. पुनर्वसन व पुनर्वसाहत भूसंपादन कायदा, २०१३ अन्वये बाधित शेतकऱ्यांना सर्व लाभ देण्यात यावेत, अशीही मागणी आंदोलकांनी केली.

संपादित करण्यात आलेले क्षेत्र ग्रीनलँड क्षेत्रात येत असल्याने संबंधित सर्व जमिनी बारमाही बागायती म्हणून ग्राह्य धराव्यात, तसेच वाजवी भावाने खरेदी करण्याचे कारण दाखवून वगळण्यात आलेले उच्चतम खरेदीखत ग्राह्य धरून फेरमूल्यांकन करावे, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय बाधित शेतकऱ्यांना प्रती एकर एक कोटी रुपये मोबदला देण्यात यावा, अशी प्रमुख मागणीही यावेळी करण्यात आली. “जमीन आमची, हक्क आमचा; अन्याय तुमचा चालणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत आंदोलकांनी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन न्याय्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

Tags: MaharashtranandedNanded Farmers ProtestPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

Next Post

परतूरसह जालना जिल्ह्यात भाजपच्या कथित दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Next Post
परतूरसह जालना जिल्ह्यात भाजपच्या कथित दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

परतूरसह जालना जिल्ह्यात भाजपच्या कथित दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

by mosami kewat
September 28, 2026
0

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सोमवारी (२८ सप्टेंबर) ‘शिक्षण अधिकार बचाव...

Read moreDetails
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

September 28, 2026
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

September 28, 2026
लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

September 28, 2026
वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’

वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home