Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

परतूरसह जालना जिल्ह्यात भाजपच्या कथित दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
August 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
परतूरसह जालना जिल्ह्यात भाजपच्या कथित दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
       
जालना : परतूर विधानसभा मतदारसंघासह जालना जिल्ह्यात आमदार लोणीकर पिता-पुत्रांसह भाजप पदाधिकाऱ्यांकडून दडपशाही करण्यात येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले. या प्रकरणात  दडपशाहीविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे पूर्व जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात यांनी केले.

यावेळी आंदोलकांनी दडपशाहीच्या प्रकारांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक साळी यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. संबंधित प्रकरणाची चौकशी करून १५ दिवसांत चौकशी अहवाल मागवून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा सचिव जमीर शेख, जिल्हा कोषाध्यक्ष सतीश खरात, तालुका अध्यक्ष मंथा सुभाष जाधव, परतूरचे हनुमंत मोरे, घनसावंगीचे समाधान तोडके यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. पोलीस प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी चौकशी निष्पक्षपणे करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

Tags: bjpjalnaMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

Next Post

अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले… तर काँग्रेस त्यांना नाकारेल का?

Next Post
अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले… तर काँग्रेस त्यांना नाकारेल का?

अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले... तर काँग्रेस त्यांना नाकारेल का?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

by mosami kewat
September 28, 2026
0

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सोमवारी (२८ सप्टेंबर) ‘शिक्षण अधिकार बचाव...

Read moreDetails
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

September 28, 2026
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

September 28, 2026
लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

September 28, 2026
वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’

वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home