Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

mosami kewat by mosami kewat
August 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात
       
नांदेड : वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने ‘किनवट संवाद दौरा टप्पा-२’ अंतर्गत रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी शासकीय विश्रामगृह, गोकुंदा, किनवट येथे संघटनात्मक बांधणी आणि जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रांतील अनेक बहुजन कार्यकर्ते व नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या ध्येय-धोरणांवर विश्वास व्यक्त करत पक्षात जाहीर प्रवेश केला. नव्याने पक्षात सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांकडून मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

बैठकीदरम्यान पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासह वंचित बहुजन आघाडीचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून व्यापक पक्षबांधणी करणे, गाव व तालुका पातळीवर नवीन शाखांची उभारणी करणे तसेच भव्य सभासद नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबविणे, या प्रमुख विषयांवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चर्चा केली.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे, उपाध्यक्ष पंढरी अहंकारे, के. एच. वने, बालाजी इंगोले, दिनेश कांबळे, सल्लागार प्रा. प्रल्हाद इंगोले, तालुकाध्यक्ष निखिल वाघमारे, तसेच हर्ष वाघमारे, प्रविण गायकवाड आणि महासचिव दूधराम राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यकर्ते व महिला आघाडीचा मोठा सहभाग

कार्यक्रमाला देवराव सोनकांबळे, डॉ. अर्जुन चव्हाण, सचिन हाटकर, अमोल गोवंदे, सुरेश मुनेश्वर, विजय पाटील, सुधाकर हलवले, सम्राट कावळे, महेंद्र वासाटे, राजू मेश्राम, आकाश वाघमारे, भैयासाहेब, साहेबराव आणि यशपाल मुनेश्वर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच महिला आघाडीच्या छायाबाई बहादुरे, रुक्मिनाबाई मस्के, सुशीला बलखंडे, लीलाबाई, निर्मलाबाई पाटील, लीलाबाई मुनेश्वर, सुमेधाताई पुपलवाड, ज्योतीताई कावळे, रुक्मिनाबाई गिमेकर आणि गंगासागरबाई शिंदे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी महासचिव दूधराम राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags: Kinwat Vanchit Bahujan AghadiMaharashtranandedPoliticalVanchit Bahujan AaghadiVBA joinनांदेड
Previous Post

सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी वर्ग यात फरक करण्याची गरज ; अशा काळात , ज्या काळात सत्ताधारी पक्ष बदलाचे पडघम वाजू लागले आहेत !

Next Post

समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!
बातमी

औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

by mosami kewat
September 28, 2026
0

औरंगाबाद : फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांच्या Gen Z पिढीशी थेट संवाद साधण्यासाठी ‘जय भीम Gen Z’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन वंचित बहुजन...

Read moreDetails
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

September 28, 2026
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

September 28, 2026
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

September 28, 2026
लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home