Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शहीद मुरली नाईक प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
June 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शहीद मुरली नाईक प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी - ॲड. प्रकाश आंबेडकर

शहीद मुरली नाईक प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी - ॲड. प्रकाश आंबेडकर

शहीद सैनिकांना समान हक्कांची मागणी!

मुंबई : शहीद अग्निवीर जवान मुरली नाईक यांच्या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयात एक महत्त्वाची सुनावणी पार पडली.

या प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी निश्चित झाली आहे. सुनावणीदरम्यान, सरकारी पक्षाने प्रतिवाद दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळेची विनंती केली. न्यायालयाने सरकारी पक्षाला ३ जुलैपूर्वी प्रतिवाद दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. (Agniveer Murali Naik)

या प्रकरणासंदर्भात, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शहीद झाल्यानंतर सरकारी लाभ आणि हक्कांबाबत नियमित सैनिक, अग्निवीर सैनिक आणि प्रादेशिक सैनिक यांच्यात होणारा भेदभाव दूर केला पाहिजे. देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या कोणत्याही सैनिकाला वेगळी वागणूक दिली जाऊ नये.

युद्धात किंवा लष्करी कारवाईत मरण पावलेल्या सर्व सैनिकांना समान आदर, समान सरकारी मदत आणि समान हक्क मिळाले पाहिजेत. शहीद झाल्यानंतर मिळणाऱ्या शासकीय लाभांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव अस्वीकार्य आहे. त्यांच्या कुटुंबीयांना समान न्याय मिळाला पाहिजे. ही मागणी घेऊनच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. (Agniveer Murali Naik)

न्यायालयानेही हे प्रकरण ऐकण्यास सहमती दर्शवली आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष ७ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीकडे लागले आहे, कारण या प्रकरणातील निर्णयाचा भविष्यात अग्निवीर, नियमित आणि प्रादेशिक सैनिकांच्या हक्कांबाबतच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर परिणाम होऊ शकतो.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून शहीद मुरली नाईक यांच्या आईने ही याचिका दाखल केली आली आहे. (Agniveer Murali Naik)

Tags: Agniveer Murali Naik
Previous Post

दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा; अकोट फाईल ते हनुमान चौक जुनी पाईपलाईन तात्काळ बदला – निलेश देव

Next Post

पुण्यात उद्या विद्यार्थी आक्रोश मोर्चा: NTA रद्द करा ; शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा

Next Post
पुण्यात उद्या विद्यार्थी आक्रोश मोर्चा: NTA रद्द करा ; शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा

पुण्यात उद्या विद्यार्थी आक्रोश मोर्चा: NTA रद्द करा ; शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home