Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मणिपूर हिंसाचार: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केले सात प्रश्न

mosami kewat by mosami kewat
September 14, 2025
in बातमी
0
मणिपूर हिंसाचार: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केले सात प्रश्न

मणिपूर हिंसाचार: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केले सात प्रश्न

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोदींनी मणिपूरला ‘भारताच्या मुकुटातील रत्न’ म्हटल्याच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर जातीय शुद्धीकरण, सत्य दडपणे आणि न्यायाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सात प्रश्न विचारत मोदींच्या या शब्दांना ‘क्रूर थट्टा’ म्हटले आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर ख्रिश्चन कुकींचे जातीय शुद्धीकरण घडवून आणल्याचा जोरदार टीका केली आहे. लीक झालेल्या ऑडिओ टेप्समध्ये बिरेन सिंग हेच हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्याचा त्यांनी बोलले.

‎प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे प्रश्न:

‎१) जर मणिपूर ‘रत्न’ असेल, तर बिरेन सिंग यांच्या सरकारने ख्रिश्चन कुकींचे जातीय शुद्धीकरण का घडवून आणले? ऑडिओ टेप्समध्ये बिरेन सिंग हेच हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी म्हटले.

‎२) ख्रिश्चन कुकींची घरे लुटली जात असताना, जाळली जात असताना आणि हजारो लोक विस्थापित होत असताना, मोदी गप्प का राहिले? महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत असताना पंतप्रधान शांत का होते?

‎३) हिंसाचाराच्या काळात मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही? ‘रत्न’ रक्तबंबाळ आणि जाळले जात असताना ते इतर राज्यांमध्ये प्रचार का करत होते?

‎४) मोदी सरकारने मणिपूरमधील सामूहिक हत्याकांड, लैंगिक हिंसाचार आणि जाळपोळीची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्यास नकार का दिला? मोदी कोणते सत्य लपवत आहेत आणि ते कोणाचे रक्षण करत आहेत, असा सवालही त्यांनी विचारला.

‎५) आपल्या देखरेखीखाली होत असलेला रक्तपात थांबवण्यासाठी काहीही न करता मोदी मणिपूरला ‘रत्न’ कसे म्हणू शकतात?

‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रश्नांच्या माध्यमातून मोदी सरकारची नैतिकता आणि मणिपूरच्या प्रश्नावरील त्यांची भूमिका यावर जोरदार टीका केली आहे.

Tags: bjpBJP Manipur CrisisHuman RightsmanipurManipur ViolencemodimumbaiPrakash Ambedkar
Previous Post

Mental Health : जगातील प्रत्येक ७ पैकी १ व्यक्ती मानसिक विकारांनी त्रस्त, WHO चा धक्कादायक अहवाल

Next Post

Pune Metro Negligence : पुणे मेट्रोच्या नियोजनशून्य कामामुळे पिंपरीत १६ दुचाकीचालक जखमी

Next Post
Pune Metro Negligence : पुणे मेट्रोच्या नियोजनशून्य कामामुळे पिंपरीत १६ दुचाकीचालक जखमी

Pune Metro Negligence : पुणे मेट्रोच्या नियोजनशून्य कामामुळे पिंपरीत १६ दुचाकीचालक जखमी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!
बातमी

अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

by mosami kewat
August 21, 2026
0

यवतमाळ : शहरातील रस्त्यालगत तसेच रस्त्याच्या हद्दीत भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तींचा गंभीर भंग...

Read moreDetails
‘विश्वगुरू’ची स्वप्ने आणि जागतिक वास्तवाची धग

‘विश्वगुरू’ची स्वप्ने आणि जागतिक वास्तवाची धग

August 21, 2026
सांगलीच्या सलगरे ग्रामपंचायतीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत

सांगलीच्या सलगरे ग्रामपंचायतीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत

August 21, 2026
हल्द्वानीतील शुद्धीकरण प्रकरण : काँग्रेसमध्ये सर्वोच्च स्तरावरही दलित नेत्याला अस्पृश्यासारखी वागणूक; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

हल्द्वानीतील शुद्धीकरण प्रकरण : काँग्रेसमध्ये सर्वोच्च स्तरावरही दलित नेत्याला अस्पृश्यासारखी वागणूक; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

August 20, 2026
नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

August 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home