Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

इतिहासाची छेडछाड: भिडे वाड्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न? बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकावरून नवा वाद

mosami kewat by mosami kewat
June 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
इतिहासाची छेडछाड: भिडे वाड्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न? बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकावरून नवा वाद

इतिहासाची छेडछाड: भिडे वाड्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न? बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकावरून नवा वाद

अमरावती : महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. हा इतिहास संपूर्ण जगाला माहीत असून ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित आहे.

परंतु, बालभारतीच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या (२०२६-२७) इयत्ता ३ री मधील ‘आपल्या सभोवतालचे जग भाग-२’ या पाठ्यपुस्तकात या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा’ असा संकुचित करण्यात आला असून इतिहासाची छेडछाड करण्यात आला आहे. ही माहिती समोर येताच नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (First Girls’ School in India)

Also Read : FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

ही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली ही शाळा देशातील (भारतातील) पहिली शाळा आहे. तरीही या शाळेचा उल्लेख महाराष्ट्रापुरता मर्यादित करण्यात आल्याने बालभारतीची ही घोडचूक तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटने मार्फत करण्यात येत आहे.

राष्ट्रीय स्मारकांमधील नोंदी आणि विविध प्रामाणिक संदर्भ ग्रंथांमध्ये या शाळेचा उल्लेख ‘देशातील पहिली शाळा’ असाच आहे. पाठ्य पुस्तकातील या मर्यादित उल्लेखामुळे ऐतिहासिक सत्याचा संकोच होत असून विद्यार्थ्यांपर्यंत चुकीचा इतिहास पोहोचत आहे. (First Girls’ School in India)

Also Read : जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?

बालभारतीसारख्या शासकीय संस्थेकडून राष्ट्रपुरुषांच्या महान कार्याबाबत अशी चूक होणे अत्यंत संतापजनक असून, यामुळे भावी पिढीमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या चुकीमुळे संपूर्ण राज्यातील शैक्षणिक वर्तुळात आणि समाजमनात तीव्र असंतोष पसरला आहे. अशा प्रकारे महापुरुषांचे कार्याला संकुचित करणे लाजिरवाणी बाब आहे. आणि महाराष्ट्रात महापुरुषांचे अशाप्रकारे प्रकार खपवून घेणार आणि तातडीने यावर बालभारतीने स्पष्टीकर द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Tags: amravatiBhide WadaFirst Girls' School in IndiaMaharashtraMahatma Jotirao Phulemarathi shalaPoliticalsavitribai phule
Previous Post

जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?

Next Post

रविदासिया धर्म संघटनेचे सुखदेव महाराज यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home