Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?

mosami kewat by mosami kewat
June 22, 2026
in अर्थ विषयक, राजकीय, सामाजिक
0
जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?
       
– संजीव चांदोरकर

सर, अभिनंदन 

एवढे सगळे होऊन देखील आपल्या देशाची जीडीपी जगात सर्वात वेगाने वाढणारी ठरणार आहे म्हणे. 

एवढे सगळे होऊन देखील शेयर मार्केट पून्हा एकदा वधारू लागले आहे 

एवढे सगळे होऊन देखील कर संकलन वाढत आहे 

पण सर, 

आम्हाला हे देखील कधीतरी सांगा की सर्व जगात भारताची जीडीपी वाढली सर्वात जास्त वेगाने तर …..

कोट्यवधी शाळा कॉलेजमधील मुला / मुलींच्या शिक्षणाची वाट लागली आहे, हजारो सरकारी शाळा दरवर्षी बंद केल्या जात आहेत  ती वेगाने सुधारेल काय ? 

एवढे तरुण आज कॉलेजचे शिक्षण घेत आहेत. या उच्च शिक्षित तरुणांना हवेतसे रोजगार मिळत नाहीत. काही शे जागा असतील तर काही लाख अर्ज येत असतात. तर अर्थव्यवस्था वेगाने वाढली की त्यांना वेगाने रोजगार मिळतील काय , सर? 

संघटित क्षेत्रातील कामगारांचे वेतनमान किंवा असंघटित क्षेत्रातील गिग वर्कर्सचे वेतन किती आणि किती वेगाने वाढेल? 

अर्थव्यवस्था वेगाने वाढली की देशातील कोट्यवधी सामान्य कुटुंबातील महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबीन किती वेगाने किती टक्क्यांनी वाढेल ? आणि कोट्यवधी गरीब कुटुंबातील लहान मुलामुलींचा बॉडी मास रेशो ? 

देशातील अनेक भागातील भूगर्भ पाण्याची पातळी ५०० फूट खाली गेली आहे ती किती वेगाने किती फूट वर येईल? 

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या येत्या काही वर्षात किती वेगाने कमी होईल 

अगदी सरकारी आरोग्य विमा कव्हर घेतलेल्या नागरिकांना ५० टक्के खर्च खिशातून करावा लागतोय ; त्यासाठी कर्जे काढावी लागत आहेत ; ते प्रमाण कसे आणि किती कमी होईल 

पोस्टची लांबी वाढेल म्हणून प्रश्न वाढवत नाही 

सर , एक विचारू का ? 

अर्थव्यवस्था किती छान काम करत आहे हे तुम्ही हाय व्होल्टेज प्रचारातून सांगत असता. त्यासाठी आकडेवारी, अगदी नाणेनिधीची साक्ष काढता. ते सर्व खोटे कसे म्हणायचे 

पण हे सर्व सिद्ध करणाऱ्या , तुमच्या गुंतागुंतीच्या अमूर्त मॅथेमॅटिकल मॉडेल मध्ये आमच्या मूर्त / डायरेक्ट हिताचे देखील काही पॅरामीटर्स घाला की जरा 

आणि सांगा जीडीपी (आणि तत्सम मॅक्रो इंडिकेटर्सचा) वेगाने वाढण्याचा आणि आमच्या दैनंदिन आयुष्याची गुणवत्ता वेगाने सुधारण्याचा नक्की काय संबंध आहे, मुळात असतो की नसतो ते जरा समजावून सांगा सर 

Tags: EconomicsFinancial AwarenessFinancial Managementgdp
Previous Post

FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

Next Post

इतिहासाची छेडछाड: भिडे वाड्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न? बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकावरून नवा वाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home