Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

mosami kewat by mosami kewat
June 22, 2026
in क्रीडा, बातमी, सामाजिक
0
FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाने ऑकलंड येथे झालेल्या FIH महिला हॉकी नेशन्स कपच्या अंतिम सामन्यात यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत शानदार विजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने पुढील हंगामातील प्रतिष्ठेच्या FIH महिला प्रो लीगमध्ये प्रवेशही निश्चित केला आहे.

अंतिम सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. सामन्याच्या चौथ्या मिनिटालाच नवनीत कौर हिने सुंदर फील्ड गोल करत भारताचे खाते उघडले. या गोलमुळे भारताला 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. पहिल्या सत्राच्या अखेरीस सुनेलिता टोप्पो हिने 15व्या मिनिटाला आणखी एक गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. त्यानंतर भारतीय बचावफळीने उत्कृष्ट कामगिरी करत न्यूझीलंडच्या आक्रमणांना यशस्वीपणे रोखले आणि यजमान संघाला सामन्यात पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. (FIH Nations Cup 2026)

Also Read : जायकवाडी वसाहत पंचशील ध्वज अवमान प्रकरणी २३ जून रोजी वंचितचा जनआक्रोश मोर्चा

अंतिम सामन्यात प्रभावी खेळ करणाऱ्या लालरेम्सियामी हिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तर स्पर्धेत भारताच्या दीपिका आणि अमेरिकेच्या ॲशली सेसा यांनी प्रत्येकी सहा गोल करत संयुक्तपणे सर्वोच्च गोलकर्त्यांचा मान पटकावला. भारतासाठी हे नेशन्स कपमधील दुसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या पहिल्या स्पर्धेतही भारतीय संघाने जेतेपद मिळवले होते. विशेष म्हणजे, यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना न गमावता अपराजित विजेतेपदाचा मान मिळवला. (FIH Nations Cup 2026)

Also Read : जागतिक सत्तासंघर्षाचे नवे पर्व : जी-७, चीन आणि बदलते जग

स्पर्धेतील साखळी फेरीत भारताने अमेरिका (3-2), जपान (2-1) आणि उरुग्वे (3-2) यांचा पराभव केला. उपांत्य फेरीत चिलीवर 6-0 अशी दणदणीत मात केल्यानंतर अंतिम फेरीत न्यूझीलंडलाही नमवत भारतीय महिलांनी सुवर्णयश संपादन केले. या ऐतिहासिक यशानंतर हॉकी इंडियाने संघासाठी विशेष रोख पारितोषिकांची घोषणा केली आहे. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये, तर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला 1.5 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

Tags: ChampionshipFIH Nations Cup 2026hockey championshipHockey Teamindia winnersportswomen's hockeyहॉकी
Previous Post

जायकवाडी वसाहत पंचशील ध्वज अवमान प्रकरणी २३ जून रोजी वंचितचा जनआक्रोश मोर्चा

Next Post

जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?

Next Post
जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?

जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे 'हित' कुठे आहे?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home