Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जायकवाडी वसाहत पंचशील ध्वज अवमान प्रकरणी २३ जून रोजी वंचितचा जनआक्रोश मोर्चा

mosami kewat by mosami kewat
June 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जायकवाडी वसाहत पंचशील ध्वज अवमान प्रकरणी २३ जून रोजी वंचितचा जनआक्रोश मोर्चा
       

लोहा : लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वजाच्या अवमान प्रकरणी तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २३ जून रोजी सकाळी १०.०० वाजता भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी व विविध सामाजिक, बौद्ध आणि आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वज सन्मानपूर्वक पुनर्स्थापित करावा, लोहा नगरपरिषद येथील नमुना क्र. ४७ मधील विश्वशांती बुद्ध विहारासाठी नियोजित ९,८४० चौरस फूट जागेची रद्द केलेली मालमत्ता नोंद क्र. २३७२ पुन्हा नोंदविण्यात यावी, विश्वशांती बुद्ध विहार व पंचशील ध्वज उध्वस्त करणाऱ्या भूमाफियांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावेत, पंचशील ध्वजासंदर्भात माननीय उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, तसेच गट क्रमांक ११४, जायकवाडी वसाहत येथील जमिनीबाबत नवीन बांधकाम व हस्तांतरण रोखण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.

या शिवाय गट क्रमांक ११४ मधील जमीन लोहा शहरातील दलित, भटके-विमुक्त व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या निवासासाठी राखून ठेवून त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना अथवा अन्य घरकुल योजनांचा लाभ देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सदर मोर्चाची सुरुवात महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे तहसील कार्यालय, लोहा अशी असेल.

या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात येणार असून कार्यक्रमाची सांगता बुद्ध वंदनेने करण्यात येणार आहे.

जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वजाचा झालेला अवमान हा संपूर्ण आंबेडकरी, बौद्ध व बहुजन समाजाच्या भावना दुखावणारा प्रकार असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून पंचशील ध्वजाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय भिकु संघाचे जिल्हाध्यक्ष भंतेजी पंय्याबोधी थेरो, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश भाऊ भोसीकर, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, जिल्हा महासचिव रवी पंडित, लोहा नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते पंचशील कांबळे, ज्येष्ठ नागरिक गंगाधर महाबळे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक गजभारे, जयपाल ढवळे, रंगनाथ गजले, छगन हटकर, नामदेव बुद्धे व माऊली रायबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्व समाजबांधव, महिला, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने जनआक्रोश मोर्चात सहभागी होऊन पंचशील ध्वजाच्या सन्मानासाठी एकजूट दाखवावी व लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांना बळ द्यावे, असे आवाहन केले.


       
Tags: protestVanchit Bahujan Aghadi
Previous Post

जागतिक सत्तासंघर्षाचे नवे पर्व : जी-७, चीन आणि बदलते जग

Next Post

FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

Next Post
FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home