Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

“गोवारी समाजाने निवडणुकीतून एकजुटता दाखवावी” – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
“गोवारी  समाजाने   निवडणुकीतून   एकजुटता  दाखवावी” – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

Adivasi, Elections, Govari, Prakash Ambedkar, Unity

आदिवासी गोवारी समुदायाचा विदर्भस्तरीय मेळावा संपन्न

नागपूर – माना आदिवासी समाजाप्रमाणेच स्वतःचा प्रतिनिधि निवडून द्यावा व स्वतःच्या समस्या स्वतःच सोडवाव्यात. आपल्या समाजाचे प्रतिनिधीच आपले प्रश्न सोडवू शकतात. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्या समाजाचे प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्याची गरज आहे. त्यामुळे गोवारी समाजाने त्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीतून एकजुटता दाखवावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

‘अन्यायग्रस्त आदिवासी गोवारी समुदायाचा विदर्भस्तरीय भव्य मेळावा’ पासपोर्ट कार्यालयाजवळ न्यू मानकापूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, कुशलभाऊ मेश्राम, अखिल भारतीय आदिवासी गोवारी शक्ती संघाचे अध्यक्ष भगवान भोंडे, राजूभाऊ लोखंडे, रवीभाऊ शेंडे, अरविंद सांदेकर, विलास वाटकर, राहुल वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.

ॲड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, गोवारी समाजाने आपल्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी संघर्ष केला. लाखोंचा मोर्चा काढला. याच नागपुरात काढलेल्या मोर्चात शेकडो समाजबांधव शहीद झाले. या घटनेची तीव्रता लक्षात यावी म्हणून मखराम पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. परंतु, सरकारने तेव्हा त्या घटनेची पाहिजे तशी दखल घेतली नव्हती. माना समाजाचाही तोच विषय होता. परंतु त्यांचा प्रश्न मार्गी लागला. गोवारी समाजाचा का नाही? कारण माना समाजाने सामूहीकपणे निर्णय घेतला. आपला प्रतिनिधी निवडून दिला. गोवारी समाजानेही तसाच सामूहिक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजय सहारे, प्रस्तावना नंदू साहारे व आभार प्रदर्शन सरला चचान यांनी केले.

गोवारी समाजाच्या मेळाव्याला जाण्या अगोदर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या झिरो माईल स्थित शहिद गोवारी स्मारक येथे जावून १९९४ मध्ये शहिद झालेल्या ११४ गोवारी बांधवांना श्रध्दांजली अर्पन केली.


       
Tags: AdivasiElectionsGovariPrakash AmbedkarUnity
Previous Post

भूम तालुक्यातील शाखापूर ग्रामपंचायत सदस्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

Next Post

औरंगाबाद येथे बाबासाहेबांच्या नामफलकावर दगडफेक; अमित भुईगळ यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.

Next Post
औरंगाबाद येथे बाबासाहेबांच्या नामफलकावर दगडफेक; अमित भुईगळ यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.

औरंगाबाद येथे बाबासाहेबांच्या नामफलकावर दगडफेक; अमित भुईगळ यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर
बातमी

भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

by mosami kewat
November 14, 2025
0

हिंगोली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी...

Read moreDetails
बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

November 14, 2025
नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

November 14, 2025
राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

November 14, 2025
सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

November 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home