Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

mosami kewat by mosami kewat
March 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

Sonam Wangchuk : लडाखमधील पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विरोधात लागू करण्यात आलेली नजरकैद केंद्राने तात्काळ मागे घेतली असून त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (NSA) करण्यात आलेली कारवाई रद्द करण्यात आली आहे. लडाखमध्ये शांतता, स्थैर्य आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच या प्रदेशाशी संबंधित प्रश्न संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यावर सरकारचा भर असल्याचेही सांगण्यात आले. (Sonam Wangchuk)

इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर : स्वाती कांबळे यांची उपअधीक्षकपदी पदोन्नती

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लडाखच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलण्याची सरकारची भूमिका कायम राहणार आहे. स्थानिक प्रतिनिधी आणि इतर संबंधित घटकांसोबत संवाद साधण्यासाठी उच्चस्तरीय समितीमार्फत चर्चा सुरू ठेवली जाणार असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

सोनम वांगचुक यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लेहमध्ये झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेण्यात आले होते. त्या आंदोलनांमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत प्रशासनाने त्यांना अटक केली होती. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करत त्यांना राजस्थानमधील जोधपूर कारागृहात ठेवण्यात आले होते. (Sonam Wangchuk)

OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

या निर्णयावर त्या काळात देशभरात चर्चा रंगली होती. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. आता सरकारने नजरकैद रद्द केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून लडाखमधील परिस्थिती पूर्ववत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लडाखमधील विविध प्रलंबित प्रश्नांवर केंद्र सरकार आणि स्थानिक प्रतिनिधींमध्ये संवादाची प्रक्रिया पुढेही सुरू राहणार असल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Tags: GovernmentDecisionHomeMinistryIndiaNewsIndiaPoliticsJodhpurJailLadakhLadakhProtestsLehNationalSecurityActNSAPublicMovementSonamWangchuk
Previous Post

बीड : नेकनूर येथे वंचित बहुजन आघाडीचे मोदी हटाव, देश बचाव घोषणेसह रस्ता रोको आंदोलन

Next Post

अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

Next Post
अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home