Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद

mosami kewat by mosami kewat
March 14, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद
       
औरंगाबाद : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील दुरुस्ती अर्जावर शुक्रवारी (दि. 13) सुनावणी झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आपली बाजू मांडली. यावेळी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून खंडपीठाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे.

न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावे तसेच संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत त्यांच्या आई विजया सूर्यवंशी यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. (Custodial Death Case)

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या जबाबांनंतर पुढील कायदेशीर कार्यवाही कोण आणि कशा प्रकारे करावी, याबाबत कायद्यात स्पष्ट तरतूद नसल्याचे त्यांनी युक्तिवादात नमूद केले. या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री यांना न्यायालयात बोलावण्यात यावे, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

मात्र, मूळ याचिकेत ही मागणी नमूद नसल्यामुळे खंडपीठाने याचिकेत दुरुस्ती करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली होती. त्यानुसार दुरुस्ती अर्ज दाखल करण्यात आला. अशी माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सरकारतर्फे अमरजितसिंह गिरासे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर खंडपीठाने दुरुस्ती अर्जावरील निकाल राखून ठेवला आहे. अशी माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना दिली. (Custodial Death Case)

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामुळे राज्यात मोठे पडसाद उमटले होते. आता कायदेशीर लढाईत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: aurangabadCourtCustodial Death CaseJusticeMaharashtraPrakash AmbedkarSomnath Suryawanshi murder caseVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

अनुसूचित जातींच्या हक्कांवर सरकारचा डाका; ‘एससी’चा १६ हजार कोटींचा निधी पडून

Next Post
अनुसूचित जातींच्या हक्कांवर सरकारचा डाका; ‘एससी’चा १६ हजार कोटींचा निधी पडून

अनुसूचित जातींच्या हक्कांवर सरकारचा डाका; ‘एससी’चा १६ हजार कोटींचा निधी पडून

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home