Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दिवे घाटात भीषण दुर्घटना : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन वारकऱ्यांचा मृत्यू

mosami kewat by mosami kewat
July 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
दिवे घाटात भीषण दुर्घटना : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन वारकऱ्यांचा मृत्यू

दिवे घाटात भीषण दुर्घटना : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन वारकऱ्यांचा मृत्यू

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरात रविवारी अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर एका ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक वारकरी जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात येत आहे. (Ashadhi Wari 2026)

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिशीकर दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज परिसरातील वारकरी या अपघातात बाधित झाले. धडक इतकी जोरदार होती की तीन महिला वारकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून इतर जखमी वारकऱ्यांना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Also Read : वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी मान्य; वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश

प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाला ताप असल्याने त्याने औषधे घेतली होती. त्यामुळे वाहन चालविताना त्याला ग्लानी आल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Ashadhi Wari 2026)

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिला वारकऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

– नंदा पवार (वय ६०), रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली

– माधवी राजाराम सलगरे (वय ५५), रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली

– राजश्री शंकर भोसले (वय ५५), रा. कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली

या घटनेतील पुढील तपास पोलिस करत आहेत.

Tags: Ashadhi EkadashiAshadhi Wari 2026Dive Ghat TragedyMaharashtraPoliticalpunewari
Previous Post

वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी मान्य; वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश

Next Post

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून ‘कॅग’ने ओढले ताशेरे: बजेटपेक्षा ३,५४१ कोटींचा अतिरिक्त खर्च 

Next Post
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून ‘कॅग’ने ओढले ताशेरे: बजेटपेक्षा ३,५४१ कोटींचा अतिरिक्त खर्च 

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेवरून 'कॅग'ने ओढले ताशेरे: बजेटपेक्षा ३,५४१ कोटींचा अतिरिक्त खर्च 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home