Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी मान्य; वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश

mosami kewat by mosami kewat
July 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी मान्य; वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश

वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी मान्य; वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश

मुंबई: ‘शिवरायांचे अंगरक्षक’ वीर जिवाजी महाले यांचे प्रतापगडावर भव्य स्मारक उभारण्यात यावे, या मागणीला अखेर शासनाने मंजुरी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यभरात घेतलेल्या सत्ता संपादन मेळाव्यांमध्ये या मागणीसाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यांच्या या संघर्षाला अखेर मोठे यश आले असून शासनाला झुकून या मागणीची दखल घ्यावी लागली आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीने केवळ भाषणांपुरती ही मागणी मर्यादित न ठेवता, आपल्या अधिकृत धोरणातही याला अग्रक्रम दिला होता. २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्यात यावे आणि त्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. पक्षाच्या याच आक्रमक भूमिकेमुळे अखेर शासनाने हा निर्णय घेतला आहे. (Veer Jivaji Mahale)

Also Read : ‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

याविषयी अधिक माहिती देताना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे म्हणाले की, ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रभर झालेल्या सत्ता संपादन मेळाव्यांमध्ये वेळोवेळी वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी अत्यंत लावून धरली होती. वंचितच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच अखेर शासनाला या न्याय्य मागणीची दखल घ्यावी लागली आणि स्मारकाची मागणी मान्य करावी लागली.

‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ असा इतिहास घडवणाऱ्या वीर जिवाजी महाले यांच्या शौर्याला योग्य सन्मान मिळावा, ही बहुजन समाजाची अनेक वर्षांची भावना होती. वंचित बहुजन आघाडीने या भावनेला राजकीय आणि सामाजिक पटलावर मुख्य प्रवाहात आणले. या ऐतिहासिक निर्णयामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हा लढा यशस्वी केल्याबद्दल बहुजन समाजातून ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले जात आहेत. (Veer Jivaji Mahale)

Tags: Jivaji Mahale MemorialMaharashtraPrakash AmbedkaPrakash AmbedkarPratapgad MemorialVanchit Bahujan AghadiVeer Jivaji Mahale
Previous Post

‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

दिवे घाटात भीषण दुर्घटना : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन वारकऱ्यांचा मृत्यू

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home