Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

mosami kewat by mosami kewat
July 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
       
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबाद मध्य शहराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परिसरात या उपक्रमाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पदाधिकारी थेट नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.

या उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक १ मधील चेतना नगर आणि रमाबाई नगर येथे पदाधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी परिसरातील महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर मांडले.

नागरिकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने पाठपुरावा करेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा हा उपक्रम पुढील काळातही विविध प्रभागांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या प्रसंगी औरंगाबाद मध्य शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, शहर महासचिव भगवान खिल्लारे, शहर महासचिव आनंद शेजूळ, महासचिव पुरुषोत्तम दाभाडे, संघटक राहुल वेलदोडे, उपाध्यक्ष राहुल गायकवाड, सचिव प्रमोद नवगिरे तसेच स्थानिक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: aurangabadMaharashtraPolitical
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नूतन तालुका कार्यकारिणी सत्कार व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात 

Next Post

वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी मान्य; वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home