Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Maharashtra Assembly Election 2024 : आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
June 26, 2025
in बातमी, राजकीय, विशेष
0
आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार - ॲड. प्रकाश आंबेडकर

आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार - ॲड. प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणूक पारदर्शक होती का?; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल!

मुंबई : 2024 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजेनंतर अचानक वाढलेल्या 76 लाख मतांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले असले तरी, निवडणूक प्रक्रिया खरोखरच फ्री आणि फेअर झाली का, यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत गंभीर प्रश्न उपस्थित केले. या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असून जे तथ्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयासमोर मांडले होते ते सर्वोच्च न्यायालयासमोर मांडू अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. (Prakash Ambedkar will go to the Supreme Court)

यावेळी ते म्हणाले की, आम्ही दाखल केलेली याचिका ही निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, नियमबद्ध आणि कायद्यानुसार झाली की नाही, याच्या तपासणीसाठी होती, असे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने २०-११-२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या प्रेसनोटमध्ये मतदानाची टक्केवारी 6.80% वाढली असल्याचे नमूद आहे, ज्यामध्ये तब्बल 76 लाख मतांची भर पडली होती.

जर ही आकडेवारी आयोग मान्य करत असेल, तर त्या अनुषंगाने नोंदी आहेत क?, हे आम्ही विचारले होते. पण, त्या नोंदी कोर्टात सादर केल्या गेल्या नाहीत. अशा परिस्थितीत ही निवडणूक खरोखर मुक्त आणि पारदर्शक होती का? याची तपासणी व्हायलाच हवी होती, असा ठाम आग्रह त्यांनी व्यक्त केला. (Prakash Ambedkar will go to the Supreme Court)

प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की, आम्ही जी याचिका दाखल केली होती, ती निवडणूक (Election) याचिका नव्हती, तर निवडणूक कंडक्टवरील रीट पिटीशन होती. मात्र, कोर्टाने तिचा निवडणूक याचिका असा अर्थ लावून ती निवडणूक याचिका असल्याचे समजले आणि त्याच आधारावर निकाल दिला. हा लोकशाहीला धक्का आहे. 

जर ही गैर संविधानिक पिटीशन होती, तर ती कशी गैर संविधानिक आहे ते सांगावे. जेव्हा निवडणूक आयोग स्वतः म्हणतोय की, 76 लाख मतदान झाले आहे असे मान्य करत आहे आणि म्हणतंय की, याचा डाटा अमच्याकडे नाहीये, तर ही पारदर्शक निवडणूक कशी काय? 

या जजमेंटवरून असं दिसून येत आहे की, निवडणुकीत जी चोरी झाली आहे, ती या चोरांना पाठीशी घालत आहे. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. (Prakash Ambedkar will go to the Supreme Court)

लोकसत्ता या दैनिकात आलेल्या विश्लेषणाचा आम्ही उल्लेख केला होता, पण कोर्टाने त्याला गांभीर्याने घेतले नाही. इतकंच नाही, तर निवडणूक आयोगाची (Election Commission) अधिकृत प्रेस नोटही निकालात विचारात घेतलेली नाही, असे सांगत त्यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी याचिकाकर्ते चेतन अहिरे, सिध्दार्थ मोकळे उपस्थित होते.

Tags: ElectionjudgementMaharashtraPrakash Ambedkarsupreme court
Previous Post

आणीबाणीच्या राजकारण आणि हुकुमशाही व्यवस्थेची पायाभरणी!

Next Post

आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान; अंगावरील कपडे, पेरणीसाठी मोदी सरकारने दिलेले ६ हजार रुपये, सर्व आमच्या सरकारमुळेच!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट
बातमी

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

by mosami kewat
September 1, 2026
0

अहिल्यानगर : स्वातंत्र्यानंतर मिळाले काय..! आमच्या हाती आलं काय..! अशा घोषणांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. ३१ ऑगस्टच्या ‘विमुक्त...

Read moreDetails
‘गाव तिथे शाखा’ मोहिमेला ठाणे जिल्ह्यात प्रतिसाद; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

‘गाव तिथे शाखा’ मोहिमेला ठाणे जिल्ह्यात प्रतिसाद; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

September 1, 2026
सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार

सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार

September 1, 2026
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

August 31, 2026
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

August 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home