Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

mosami kewat by mosami kewat
January 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली
       
बारामती  : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. या अपघातात अजित पवारांसह एकूण सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, डीजीसीएकडून (DGCA) या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये झंझावाती सभा घेणार होते. यासाठी ते आज सकाळी मुंबईहून खाजगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. बारामती विमानतळावर उतरत असतानाच विमानावरचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणातच विमान जवळच्या शेतात कोसळून त्याला भीषण आग लागली. (Ajit Pawar passed away)

या अपघातात ६ जणांचे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे दोन वैयक्तिक सहाय्यक, वैमानिक आणि अन्य दोन व्यक्तीचे समावेश होते. यावेळी विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून बचावकार्य तातडीने राबवण्यात आले. 

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी श्रद्धांजली वाहिली 

या धक्कादायक घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनाने मला खूप धक्का बसला आहे. अजित पवारांची काम करण्याची एक स्वतःची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती, हे नाकारता येणार नाही.” (Ajit Pawar passed away)

“त्यांच्या पत्नी, कुटुंब, मित्र आणि पक्षाच्या दुःखात मी सहभागी आहे” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या भीषण विमान अपघातात अजित पवारांसह इतर ५ जणांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, “ज्या विमान अपघातात ६ जणांचा बळी गेला, त्या घटनेची अत्यंत योग्य आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. (Ajit Pawar passed away)

प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

Tags: Ajit Pawar passed awayBaramatiCongressMaharashtraPlane crashPoliticalpolticsPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा! परभणीत ‘वंचित’ आक्रमक, फोटोला मारले जोडे

Next Post

धक्कादायक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली 

Next Post
धक्कादायक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली 

धक्कादायक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; अंजलीताई आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या पक्ष व चिन्ह वादात भाजपचाच राजकीय फायदा; धनुष्यबाण चिन्ह हे गोठवले जाईल ― ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

शिवसेनेच्या पक्ष व चिन्ह वादात भाजपचाच राजकीय फायदा; धनुष्यबाण चिन्ह हे गोठवले जाईल ― ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
August 20, 2026
0

अकोला : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असं दिसतंय की, आधी दक्षता न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे...

Read moreDetails
“मनरेगा”च्या नव्या अवताराने “व्हीबी-रामजी”ने पहिल्याच महिन्यात रंग दाखवायला सुरुवात

“मनरेगा”च्या नव्या अवताराने “व्हीबी-रामजी”ने पहिल्याच महिन्यात रंग दाखवायला सुरुवात

August 20, 2026
माता रमाई आंबेडकर नगर वसतिगृहातील समस्यांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी

माता रमाई आंबेडकर नगर वसतिगृहातील समस्यांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी

August 20, 2026
अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक

अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक

August 20, 2026
बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादेचा प्रश्न वंचितने आणला ऐरणीवर; बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाला पत्र; संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा

बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादेचा प्रश्न वंचितने आणला ऐरणीवर; बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाला पत्र; संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा

August 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home