वंचित बहुजन आघाडीने दाखल केली तक्रार
अमरावती : आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर फोटोंवर शासकीय यंत्रणाकडून कारवाई केली जाते. मात्र, सध्याचे चित्र बदलले असून, भाजपचे नेते मोदींचा फोटो लावून अमरावती विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटद्वारे भाजपचा प्रचार करीत असल्याचे दिसून आले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने याबाबत तक्रार दाखल केली आहे. तसेच, तातडीने वेबसाईटवरील फोटो हटविण्याची मागणी केली आहे.