Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बीड हादरले! वाळू माफियांकडून बौद्ध तरुणांवर जीवघेणा हल्ला; सुजात आंबेडकरांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुन्हा दाखल

mosami kewat by mosami kewat
March 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बीड हादरले! वाळू माफियांकडून बौद्ध तरुणांवर जीवघेणा हल्ला; सुजात आंबेडकरांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुन्हा दाखल
       

बीड : गेवराई तालुक्यातील गुळज परिसरात अवैध वाळू तस्करी करणाऱ्या व्यक्तींकडून दोन बौद्ध तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात रमेश निकाळजे आणि परमेश्वर गवारे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश निकाळजे यांच्या घरासमोरून भाजपच्या अवैध वाळू माफिया वाहतूक करणारी वाहने मोठ्या वेगाने जात होती. घराजवळ लहान मुले असल्यामुळे वाहन सावकाश चालवावे, अशी विनंती निकाळजे यांनी संबंधित डंपर चालकाला केली होती. मात्र, याच कारणावरून आरोपींनी राग मनात धरत निकाळजे यांच्यावर तलवार, कुकरी व इतर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. (Sujat Ambedkar)

या हल्ल्यात रमेश निकाळजे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तब्बल ४५ टाके पडले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या परमेश्वर गवारे यांच्यावरही हल्लेखोरांनी मारहाण केली.

हल्ल्यानंतर पीडितांनी चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, सुरुवातीला पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सत्तेतील पक्षाचे (भाजप) नाव जोडून वाळू माफियांकडून हा दहशतवाद सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (Sujat Ambedkar)

दरम्यान, ही बाब वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार पक्षाचे पदाधिकारी पीडितांची भेट घेण्यासाठी गेले व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून अखेर एफआयआर दाखल करण्यात आला. (Sujat Ambedkar)

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्यासह डॉ. दिनेश सुरडकर, अ‍ॅड. गौतम साळवे, मिलिंद सरपते, रोहन मगर आणि धम्मा धूळधुळे उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अवैध वाळू तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


       
Tags: attackbeedbeed crimeMaharashtraSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

RSS मुख्यालयावरील मोर्चासाठी वंचितने कंबर कसली; औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक

Next Post

Mumbai Protest : वाढत्या महागाईविरोधात वरळीत ‘वंचित’चे  आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध

Next Post
Mumbai Protest : वाढत्या महागाईविरोधात वरळीत ‘वंचित’चे  आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध

Mumbai Protest : वाढत्या महागाईविरोधात वरळीत 'वंचित'चे  आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी
बातमी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष...

Read moreDetails
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home