अकोला : येथे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले वचन पूर्ण करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांची विचारपूस केली व त्यांचा संघर्ष योग्य असल्याचे सांगत ठाम पाठींबा दर्शविला. आंबेडकर म्हणाले की, “सरकारने शेतकऱ्यांना फसवणे थांबवून तात्काळ कर्जमुक्ती करावी. अन्यथा हा लढा अधिक तीव्र होईल.”
या भेटीमुळे उपोषणकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून लढ्याला अधिक बळ मिळाले आहे.