Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सोलापूरला पुराचा धोका वाढला! हिप्परगा तलावातून ६०० क्युसेकने विसर्ग, नदी-नाल्यांना पूर

mosami kewat by mosami kewat
August 14, 2025
in बातमी
0
सोलापूरला पुराचा धोका वाढला! हिप्परगा तलावातून ६०० क्युसेकने विसर्ग, नदी-नाल्यांना पूर

सोलापूरला पुराचा धोका वाढला! हिप्परगा तलावातून ६०० क्युसेकने विसर्ग, नदी-नाल्यांना पूर

‎सोलापूर : पाच दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे हिप्परगा तलाव पूर्णपणे भरला आहे. तलावाच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या सांडव्यांमधून ६०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे तलावाजवळील १० ते १५ घरांमध्ये पाणी शिरले आहे.
‎
‎सांडव्यांमधून पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे आदीला नदी आणि देगाव नाल्याला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याने जुना पुना नाका परिसराला वेढा घातला आहे. तसेच, शेळगी नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर-तुळजापूर महामार्गावरही पाणी आले आहे.
‎बुधवारी पहाटेपासून धाराशिव, तुळजापूर आणि जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका सोलापूरला बसत आहे. मार्डी, बाणेगाव आणि इतर अनेक लहान-मोठ्या ओढ्यांमधून वाहणाऱ्या पाण्यामुळे हिप्परगा तलाव पूर्ण भरला आणि त्यातून पाण्याचा प्रवाह वाढला. पाटबंधारे विभागाने महापालिकेला पत्र पाठवून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
‎
‎नाला वळविल्याने घरांमध्ये शिरले पाणी
‎
‎अवंतीनगर येथील जुन्या बाराकमानीजवळ ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाजवळ आदीला नदी आणि शेळगी नाला एकत्र येतात. पण शेळगी नाला वळवून तो आदीला नदीला जोडण्यात आला आहे. मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलला आणि पुलाच्या दुसऱ्या बाजूचा नैसर्गिक नाला बुजवून तिथे घरे बांधण्यात आली आहेत. यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आणि त्याची क्षमताही घटली. यामुळे पाऊस वाढल्यावर हिप्परगा तलावातील पाणी वाढते आणि जुना पुना नाला, वसंत विहार, अवंतीनगर, गणेशनगर या भागांमध्ये पाणी शिरते, ज्यामुळे लोकवस्तीला पुराचा धोका निर्माण होतो.

Tags: MonsoonrainsolapurTuljapur
Previous Post

Solapur : वडवळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

Next Post

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी SIT चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी SIT चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी SIT चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
October 3, 2025
0

अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...

Read moreDetails
Dhamma Chakra Pravartan Din : सत्ताधारी समाज कायम वंचितांना वंचित ठेवतो – अंजलीताई आंबेडकर 

Dhamma Chakra Pravartan Din : सत्ताधारी समाज कायम वंचितांना वंचित ठेवतो – अंजलीताई आंबेडकर 

October 3, 2025
मनुवाद्यांनी उच्चशिक्षित युवकांना संपवले; सुजात आंबेडकर यांचा आक्रोश, आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार

मनुवाद्यांनी उच्चशिक्षित युवकांना संपवले; सुजात आंबेडकर यांचा आक्रोश, आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार

October 3, 2025
महिला-शेतकरी-विद्यार्थ्यांवरील अन्यायावरून वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक; अकोला धम्म मेळाव्यात सरकारवर हल्लाबोल

महिला-शेतकरी-विद्यार्थ्यांवरील अन्यायावरून वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक; अकोला धम्म मेळाव्यात सरकारवर हल्लाबोल

October 3, 2025
धम्मचक्र प्रवर्तन दिन: अकोल्याच्या ऐतिहासिक धम्म मेळाव्यात अंजलीताई आंबेडकर यांचे आगमन

धम्मचक्र प्रवर्तन दिन: अकोल्याच्या ऐतिहासिक धम्म मेळाव्यात अंजलीताई आंबेडकर यांचे आगमन

October 3, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home