अकोला : स्वच्छतेचे अग्रदूत आणि थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत गाडगेबाबा यांच्या विचारांना उजाळा देत युवकांनी समाजसेवेचा संकल्प सोडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे आणि जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी गाडगेबाबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. (Sant Gadge Baba Jayanti)
‘शिक्षण आणि सेवा हीच खरी भक्ती’
यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी बाबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “शिक्षणाशिवाय प्रगती नाही” हा मूलमंत्र बाबांनी समाजाला दिला. अनाथ, अपंग आणि दीनदुबळ्यांची सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे, हा त्यांचा दृष्टिकोन आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले. हातात मातीचे गाडगे (मडके) आणि फाटके कपडे अशा साध्या राहणीमानातून त्यांनी स्वच्छतेचा आणि स्वावलंबनाचा जो संदेश दिला, तो युवकांनी आपल्या आयुष्यात अंगीकारावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (Sant Gadge Baba Jayanti)
या कार्यक्रमाला जिल्हयातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने सुगत डोंगरे (बाळापूर तालुका अध्यक्ष), मिलिंद दामोदर (अकोला तालुका अध्यक्ष), आशिष रायबोले (अकोट तालुका अध्यक्ष), तसेच शुभम साऊथकर, आकाश जंजाळ, नितीन वानखडे, अनिकेत हागे, अमोल वसंत वानखडे, भूषण वानखडे, साहिल बोदडे, शुभम नाईक, अमोल वानखडे, सिद्धार्थ शिरसाठ, आकाश जाधव, राहुल अहिर, राहुल सुरवाडे, सागर इंगळे, कुणाल सरदार, राज बोदळे, सचिन शिराळे, युवराज डोंगरे यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...
Read moreDetails






