अकोला : अकोला येथील प्रथितयश ॲड. राजन देशपांडे यांचे वडील नानासाहेब देशपांडे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशपांडे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुःखद प्रसंगी बाळासाहेब आंबेडकर यांनी देशपांडे कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी नानासाहेब देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, नगरसेवक निलेश देव आदी उपस्थित होते.
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...
Read moreDetails






