नवी दिल्ली : दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळणं सुरूच आहे. आज पुन्हा पश्चिम विहार आणि रोहिणी सेक्टर 3 मधील अभिनव पब्लिक स्कूलला बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले आहेत. या माहितीनंतर तातडीने अग्निशमन दल, दिल्ली पोलीस आणि बॉम्ब शोधक पथके घटनास्थळी पोहोचली असून, शाळांमध्ये कसून शोधमोहीम सुरू आहे.
गेल्या सोमवारपासून दिल्लीतील शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळण्याचा हा सलग चौथा दिवस आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्याचंही वृत्त आहे. या धमक्यांमुळे शाळा प्रशासनामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि खबरदारी म्हणून सर्व शाळा रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत कोणत्याही शाळेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक शाळांना एकाच ईमेल आयडीवरून धमक्या मिळाल्या आहेत. सध्या पोलीस ईमेल पाठवणाऱ्या संशयिताचा शोध घेत आहेत.
शाळा प्रशासनाने पालकांना सोशल मीडियाद्वारे या परिस्थितीची माहिती दिली आहे. सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तपास करत असल्या तरी, कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडलेली नाही. दिल्लीतील शाळांना मिळत असलेल्या या सलग धमक्यांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबईत निषेध बैठक
मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने नुकत्याच विधानसभेत पारित केलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज मुंबई पत्रकार संघात एका निषेध बैठकीचे आयोजन...
Read moreDetails