Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन!

mosami kewat by mosami kewat
July 19, 2025
in बातमी
0
मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन!

मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन!

‎मुंबई : वंचित बहुजन आघाडी ( VBA) च्यावतीने मुंबई येथील सायन कोळीवाडा, प्रभाग क्रमांक १७६ येथील त्रिरत्न बुद्ध विहारात वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्र. १७६ चे समन्वयक प्रतीक मोहन कांबळे यांच्यावतीने धम्मबांधवांना अल्पोपहार वाटप करण्यात आले.
‎
‎कार्यक्रमादरम्यान, त्रिरत्न बुद्ध विहाराचे कार्यकर्ते अॅडव्होकेट मोतीराम जाधव यांनी समन्वयक प्रतीक मोहन कांबळे यांचा सत्कार केला. तसेच, भारतीय बौद्ध महासभा, झोन क्र. २ चे उपाध्यक्ष रमेश वाघचौरे यांचा सत्कार जगताप साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. ‎प्रतीक मोहन कांबळे यांनी या प्रसंगी धम्म बांधवांना वर्षावासाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि पक्षाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल सविस्तर माहिती दिली.
‎
‎या कार्यक्रमाला त्रिरत्न बुद्ध विहाराचे पदाधिकारी भगवान तूपलोंढे आणि जगताप साहेब उपस्थित होते. याशिवाय, विशाखा धम्म जागृती समितीच्या काळे ताई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समितीच्या वस्तला हिरे ताई यांचीही उपस्थिती होती.
‎
‎भारतीय बौद्ध महासभा, झोन २ चे उपाध्यक्ष, बौद्धचार्य आणि माजी श्रामनेर रमेश वाघमारे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. वंचित बहुजन आघाडीचे सायन कोळीवाड्याचे माजी तालुका अध्यक्ष अशोक इंगळे, माजी महासचिव दिनेश कांबळे, आणि माजी महिला तालुका अध्यक्षा आरती कांबळे हे देखील उपस्थित होते. प्रभाग क्र. १७६ चे कार्यकर्ते संकेत कांबळे, युवा वॉर्ड महासचिव दीपक कांबळे, आणि बाजीराव झणकर यांच्यासह अनेक स्थानिक धम्मबांधवांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

Tags: mumbaiVarshavas programvbaforindia
Previous Post

दिल्लीतील शाळांना सलग चौथ्या दिवशी बॉम्बच्या धमक्या

Next Post

‎वंचित बहुजन आघाडीचा ‘महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयका’ला तीव्र विरोध

Next Post
वंचित बहुजन आघाडीचा 'महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयका'ला तीव्र विरोध

‎वंचित बहुजन आघाडीचा 'महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयका'ला तीव्र विरोध

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home