Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नांदगाव पोडे, विसापूरातील शेतकऱ्यांना दिलासा; वंचितच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात

mosami kewat by mosami kewat
February 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नांदगाव पोडे, विसापूरातील शेतकऱ्यांना दिलासा; वंचितच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात
       
चंद्रपूर : नांदगाव पोडे व विसापूर हद्दीतील शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून WCL कडून सोडण्यात येणाऱ्या वेस्ट वॉटरमुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतात साचणारे दूषित पाणी, पिकांचे प्रचंड नुकसान, जमिनीची उत्पादकता घटणे आणि आर्थिक तोटा यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते.

या गंभीर प्रश्नावर वंचितचे सिद्धांत पुणेकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या मागण्या प्रशासनासमोर ठामपणे मांडल्या. WCL ने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी तसेच शेतात सोडण्यात येणारे वेस्ट वॉटर दुसरीकडे वळवावे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली. या पाठपुराव्याची दखल घेत बल्लारपूरच्या तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली व समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले. (Chandrapur news)

सिद्धांत पुणेकर यांनी इशारा दिला की, “जर एका आठवड्यात प्रश्न निकाली निघाला नाही, तर सर्व बाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.” या ठाम भूमिकेनंतर WCL प्रशासनाने चार वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या सोडवण्यास सुरुवात केली आहे. तथापि, मागील चार वर्षांत झालेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची पूर्ण नुकसान भरपाई मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा लढा सुरूच राहणार आहे. असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. (Chandrapur news)

यावेळी वंचितचे आशिष तितरे, नांदगावचे माजी ग्राम पंचायत सदस्य सुनील शेंडे, विसापूरचे माजी ग्राम पंचायत सदस्य गजानन पाटणकर, सचिन जमदाडे, मुलचंद वनकर, शुभम येरगुडे, अविनाश टोंगे, देविदास हरणे व समस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.

Tags: chandrapurMaharashtraPoliticalpoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन 

Next Post

नागपूर हादरले! काटोलमधील ‘SBL’ स्फोटक कारखान्यात भीषण स्फोट; १७ कामगारांचा मृत्यू

Next Post
औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन 

नागपूर हादरले! काटोलमधील 'SBL' स्फोटक कारखान्यात भीषण स्फोट; १७ कामगारांचा मृत्यू

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home