Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे जैनापूर शिरवळ येथे उद्घाटन

mosami kewat by mosami kewat
July 19, 2025
in बातमी
0
वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे जैनापूर शिरवळ येथे उद्घाटन

वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे जैनापूर शिरवळ येथे उद्घाटन

       

‎
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारांना आणि आदिवासी, भटक्या तसेच वंचित समाजाला सत्तेत आणण्याच्या त्यांच्या तळमळीला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील जैनापूर शिरवळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रशेखर मढी खांबे यांच्या उपस्थितीत पार पडले.
‎
‎यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मढी खांबे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांच्या चळवळीसाठी आणि त्यांना सत्तेमध्ये बसवण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत आहेत.
‎
‎सध्या महाराष्ट्रात जे जाती-धर्माचे राजकारण सुरू आहे आणि सर्व क्षेत्रांमध्ये संविधानाची पायमल्ली होताना दिसत आहे, त्याला आळा घालण्यासाठी सर्वसामान्य आणि सर्व जाती-धर्मांची सत्ता आणणे आवश्यक आहे. वंचितांना सत्तेमध्ये बसवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा हात बळकट करणे गरजेचे आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.
‎
‎या शाखा उद्घाटनासाठी तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख आणि शंकर शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांनी गावोगावी फिरून शाखा उभी करण्याचा प्रयत्न केला. तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि जैनापूर शिरवळ येथील पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.
‎
‎यावेळी जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, तालुका उपाध्यक्ष धर्मराव बिराजदार, मानतेस सीताफळे, तालुका सहसचिव शिवाजी मंत्रेकर, बापू जंगल भाग, मारुती गोत्र सुर्वे, तालुका संघटक रमेश गायकवाड, तालुका महिला अध्यक्ष सुरेखाताई साबळे, चंद्रकांत वाघमारे, प्रकाश गायकवाड, शाखाध्यक्ष औज उमेश वाघमारे, लक्ष्मीताई सोनकांबळे,
‎
‎शाखाध्यक्ष रवी भाले, शाखा उपाध्यक्ष चंद्रकांत सोनकांबळे, शाखा महासचिव यल्लाप्पा सोनकांबळे, तसेच युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, अक्कलकोट शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, चपळगाव शाखाध्यक्ष माणिकचंद गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‎


       
Tags: JainapurSolapur districtvbaforindia
Previous Post

अन्यथा मुंबईत ‘संन्यस्त खड्ग’ नाटकाचे प्रयोग बंद पाडू : वंचितचे चेतन अहिरे यांचा इशारा!

Next Post

दिल्लीतील शाळांना सलग चौथ्या दिवशी बॉम्बच्या धमक्या

Next Post
दिल्लीतील शाळांना सलग चौथ्या दिवशी बॉम्बच्या धमक्या

दिल्लीतील शाळांना सलग चौथ्या दिवशी बॉम्बच्या धमक्या

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 
अर्थ विषयक

दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

by mosami kewat
November 10, 2026
0

- संजीव चांदोरकर  एक काळ असा होता कि मुंबईतील गिरण्या / ठाण्याच्या / आणि नासिक , औरंगाबाद सह औद्योगिक कारखान्यात...

Read moreDetails
राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

November 8, 2026
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

November 7, 2026
भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

November 6, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

November 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home