Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भाजप आणि काँग्रेस या दोन्हींविरुद्ध एकदिलाने लढा द्या ! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आदिवासींना आवाहन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 9, 2023
in बातमी, राजकीय
0
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई
       

मुंबई : जागतिक आदिवासी दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दोन बातम्यांचे स्क्रीनशॉट ट्विट करत भाजप आणि काँग्रेस या दोन्हींविरुद्ध एकदिलाने लढा देण्याचे आवाहन आदिवासी समूहाला केले आहे. या दोन्ही पक्षांमध्ये आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आदिवासींची मते मिळविण्यासाठी “सर्वात गोड लॉलीपॉप” देण्याची स्पर्धा लागेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

भारतीय ट्राईबल पार्टीला रोखण्यासाठी राजस्थानच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याची बातमी, आणि छत्तीसगढ मध्ये आदिवासी आंदोलनाच्या विरोधात काँग्रेसने भाजपचे मॉडेल स्वीकारल्याची बातमी असे दोन बातम्यांचे स्क्रीनशॉट ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केले आहेत.

भाजप आणि कॉँग्रेसच्या आदिवासीं बद्दलच्या धोरणावर घणाघाती टीका करताना ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, ‘ते मोठ मोठे स्टंट करतील आणि अगदी मोठ्या कलाकारांनाही मागे टाकतील. आज त्यांची राजकीय हाव नेहमीपेक्षा थोडी वेगळी असेल. राजद्रोह कायदा आणि यूएपीए अंतर्गत आदिवासींना नेहमीप्रमाणे अटक करण्याऐवजी आदिवासींची मते ‘अटक’ करण्याची स्पर्धा लागणार आहे. आपल्या भांडवलदार धन्यांच्या जल, जंगल आणि जमिनीच्या स्वार्थासाठी लाखो आदिवासींना आपापल्या राज्य सरकारांमध्ये विस्थापित करण्याऐवजी आज ते एकमेकांना ‘विस्थापित’ करण्याची स्पर्धा करतील.’

भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे ‘लॉलीपॉप’ घेऊ नका असं सांगतानाच ‘त्यांच्यासाठी नाचू नका, तर त्यांना तुमच्या तालावर नाचायला लावा. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही भाजप आणि काँग्रेस या दोन्हींविरुद्ध एकदिलाने लढा द्याल; तुमची ओळख मजबूत करा आणि स्वतंत्र राजकीय आवाज व्हा.’ असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

Today on #WorldTribalDay both the @BJP4India and @INCIndia will compete with each other as to who can hold the “sweetest lollipop” to offer the Adivasis to win their votes for the upcoming Assembly and Parliamentary elections.

They will indulge in big stunts and give acting… pic.twitter.com/RDpfk6dtpy

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 9, 2023

       
Tags: AdivasiPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiWorld Tribal Day
Previous Post

व्याळा येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मा. सुजातजी आंबेडकर यांनी दिली सांत्वन भेट..

Next Post

स्पर्धा परीक्षार्थींसाठी वंचित मैदानात

Next Post
स्पर्धा परीक्षार्थींसाठी वंचित मैदानात

स्पर्धा परीक्षार्थींसाठी वंचित मैदानात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
बातमी

नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

by mosami kewat
April 30, 2026
0

Budget 2026 : नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या अर्थसंकल्प बैठकीपूर्वी मनपाच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन 2022 ते 2025...

Read moreDetails
हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

April 28, 2026
मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

April 28, 2026
टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

April 28, 2026
रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

April 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home