Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

SC, ST, OBC समाजाची प्रगती जातीयवादी मानसिकतेला पचत नाही; ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
August 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
SC, ST, OBC समाजाची प्रगती जातीयवादी मानसिकतेला पचत नाही; ॲड. प्रकाश आंबेडकर
       

मुंबई : दलित समाजाला उद्देशून सार्वजनिक ठिकाणी तसेच सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या जातीयवादी शिव्यांचा व द्वेषपूर्ण वक्तव्यांचा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जातीयवादी शिव्यांमुळे आम्ही गप्प बसणार नसून, अशा प्रत्येक कृतीतून संबंधितांची जातीयवादी मानसिकताच उघड होत असल्याचा निशाणा त्यांनी साधला.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट करत जातीयवादी मानसिकतेवर कठोर टीका केली. सध्या दिल्लीत आरक्षण विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात SC, ST समूहाला शिव्या गाळ केल्या जाताय.

दलित समाजाला उद्देशून वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद आणि जातीयवादी शिव्यांचा उल्लेख करत त्यांनी, तुम्ही विष ओकता तेव्हा आम्हाला कमकुवत करत नाही, तर तुमची स्वतःची जातीयवादी मानसिकता उघड करता, असा संदेश दिला.

ब्राह्मणवादी आणि मनुवादी मानसिकतेतून केल्या जाणाऱ्या शिव्यांमधून संबंधितांची मानसिकता स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले. बाबासाहेब आंबेडकर, आरक्षण आणि दलित समाजाला लक्ष्य केले जाते, तेव्हा फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार आणि सामाजिक न्यायाची चळवळ आजही किती आवश्यक आहे, याचीच जाणीव होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Also Read : भारतीय बौद्ध महासभेच्या राज्यस्तरीय बैठकीत धम्मप्रसार व संघटना विस्ताराचा निर्धार; डॉ. भीमराव आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

पुढे ते म्हणाले की, संविधान आणि आरक्षणाच्या माध्यमातून समानता निर्माण होत असून SC, ST आणि OBC समाजाची प्रगती होत असल्याने जातीयवादी मानसिकतेला हे पचत नसल्याचेही आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

जेव्हा जेव्हा ब्राह्मणवादी आणि मनुवादी आम्हाला शिव्या द्याल, तेव्हा तेव्हा आम्ही जय भीम म्हणू, जय संविधान म्हणू, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच जातीयवादी शक्तींकडून कमी लेखण्याचा प्रयत्न झाला, तर अधिक शिक्षित होऊ, संघटित होऊ आणि आंदोलन करू, हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मार्ग पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जातीय द्वेषपूर्ण वक्तव्ये आणि अपमानास्पद शिव्या या समाजातील जातीय भेदभावाचे गांभीर्य अधोरेखित करतात. त्यामुळे सामाजिक न्याय, समानता आणि SC, ST व OBC समाजाच्या आरक्षणाची आवश्यकता अधिक ठळक होते, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.


       
Tags: casteismConstitutionEducationMaharashtraobcPoliticalPrakash AmbedkarscstVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

भारतीय बौद्ध महासभेच्या राज्यस्तरीय बैठकीत धम्मप्रसार व संघटना विस्ताराचा निर्धार; डॉ. भीमराव आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

Next Post

मडकी वस्तीत ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; सुजात आंबेडकरांची मुस्लिम समाजातील तरुणांशी संवाद

Next Post
मडकी वस्तीत ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; सुजात आंबेडकरांची मुस्लिम समाजातील तरुणांशी संवाद

मडकी वस्तीत ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; सुजात आंबेडकरांची मुस्लिम समाजातील तरुणांशी संवाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home