Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मडकी वस्तीत ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; सुजात आंबेडकरांची मुस्लिम समाजातील तरुणांशी संवाद

mosami kewat by mosami kewat
August 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मडकी वस्तीत ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; सुजात आंबेडकरांची मुस्लिम समाजातील तरुणांशी संवाद
       
सोलापूर : ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापूर शहरातील मडकी वस्ती येथे मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून समाजबांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील नागरिक आणि तरुणांची मोठी उपस्थिती होती.

यावेळी सुजात आंबेडकर यांनी इस्लाममधील ‘मसावत’ म्हणजेच समता या संकल्पनेवर विचार मांडले. आंबेडकरवादी आणि मुस्लिम समाजाने एकत्र येणे हा मसावत अर्थात समतेचा संगम असल्याचे त्यांनी सांगितले.

देशभरात मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या सन्मानाला धक्का पोहोचविणाऱ्या घटना घडत असल्याचा आरोप करत, भाजप-आरएसएसच्या सरकारकडून मुस्लिम समाजाला जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचेत्यांनी सांगितले.

Also Read : SC, ST, OBC समाजाची प्रगती जातीयवादी मानसिकतेला पचत नाही; ॲड. प्रकाश आंबेडकर

ईद आणि भीम जयंतीसारखे सण रस्त्यावर सन्मानाने साजरे करता येतात, यामागे पूर्वजांनी केलेला राजकीय संघर्ष महत्त्वाचा आहे, असेही सुजात आंबेडकर यांनी नमूद केले. सणाच्या दिवशीही आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, मुस्लिम समाजातील तरुणांना मॉब लिंचिंगसारख्या घटनांना सामोरे जावे लागत असून, कोणतीही घटना घडली तरी पोलिसांकडून प्रथम मुस्लिमांच्या घरांवर कारवाई केली जाते आणि तरुणांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले जाते, असा आरोपही त्यांनी केला. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी आणि प्रश्नांसाठी लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे आयोजन मॉडेल बॉईजमधील मुस्लिम तरुणांनी केले होते. कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील मोठ्या संख्येने तरुण तसेच वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Eid MilanMaharashtraMuslim youthPoliticalsolapurVanchit Bahujan Aaghadiसोलापूर
Previous Post

SC, ST, OBC समाजाची प्रगती जातीयवादी मानसिकतेला पचत नाही; ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

३१ ऑगस्ट रोजी पुण्यात राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद; लक्ष्मण हाके व डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर
बातमी

वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर

by mosami kewat
September 15, 2026
0

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांशी तातडीने संपर्क साधण्याची मागणी! मुंबई : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील दलित, आदिवासी...

Read moreDetails
प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

September 15, 2026
चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

September 15, 2026
हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

September 15, 2026
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home