मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशातील सामाजिक समता, बंधुता, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधानिक मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.






