Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात ध्वजारोहण; संविधानिक मूल्ये आणि लोकशाही रक्षणाचा संकल्प

mosami kewat by mosami kewat
August 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पुणे स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात ध्वजारोहण; संविधानिक मूल्ये आणि लोकशाही रक्षणाचा संकल्प
       
पुणे : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी, पुणे शहराच्या वतीने पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भव्य ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बार्टी (BARTI) चे विभाग प्रमुख प्रा. डॉ. बबन जोगदंड यांच्या हस्ते अत्यंत उत्साही वातावरणात ध्वजारोहण पार पडले. या सोहळ्यास ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी भूषवले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित करताना वक्त्यांनी संविधानिक मूल्ये, सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची तातडीची गरज अधोरेखित केली. तसेच संविधानाने दिलेल्या हक्कांची आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचा ठाम संकल्प याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. पी. सावळे यांनी केले.

या सोहळ्याला उत्तम वनशिव, विशाल गवळी, मेजर ॲड. अनिल कांबळे, मेजर राजरत्न थोरात, प्रा. बी. पी. सावळे, नवनीत अहिरे, जॉर्ज मदनकर, राजाभाऊ ढाले, जीवन रोकडे, सतीश रणवरे, नितीन कांबळे, सतीश साबळे, अंबादास ओव्हाळ, माणिक लोंढे, सारिका फडतरे, सुजाता ओव्हाळ, अमोल भडकवाड, विशाल वंजारी, हरी वाघमारे, प्रमोद कदम, मोहन गाडेकर, योगेश वानखेडे, सचिन कलाधर, दासरी, दीपक गायकवाड, 

शुभांगी काकडे, निरंजनाताई सोनावणे, रिनाताई वानखेडे, विशाल सरवदे, अकबर सय्यद, प्रवीण साठे, शरीफ शेख, सुनील अमृतसागर यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व समता सैनिक दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त करत सोहळ्याची सांगता केली.

Tags: ConstitutionDr Babasaheb AmbedkarIndipendent dayMaharashtraPoliticalpunePune StationVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

Next Post
शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home