मंगळवेढा : दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) परीक्षा प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व अश्रुधूराचा वापर करून करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवेढा बंदचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे यांना देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार गुरुवार, दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानिमित्त मंगळवेढ्यातील दामाजी चौक येथे श्री संत दामाजी पंत यांच्या पुतळ्यास तालुकाध्यक्ष अशोक माने व शशिकांत रोकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकार व पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत शहरातून मोर्चा काढण्यात आला.
मोर्च्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा काढावा, जखमी आंदोलकांना योग्य शासकीय मदत द्यावी तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. राहुल घुले, माजी उपनगराध्यक्ष विजयकुमार खवतोडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोक माने, पोपट पडवळे आदींनी सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजय गाडे यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाच्या कलम १९ चा उल्लेख करत, देशातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने आपले प्रश्न मांडण्याचा व न्याय मागण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. आंदोलनकर्त्यांचे प्रश्न न ऐकता त्यांच्यावर लाठीचार्ज व अश्रुधूराचा वापर करून त्यांचे हक्क दडपण्याचा प्रयत्न करणे लोकशाहीच्या तत्त्वांविरोधात असून अत्यंत घातक असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोक माने, शहराध्यक्ष अजय गाडे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, जिल्हा युवा महासचिव सोमनाथ ढावरे, काँग्रेस शहराध्यक्ष ॲड. राहुल घुले, पँथर तालुकाध्यक्ष सिद्धार्थ लोकरे, सतीश लोकरे, ईसाक शेख, अखिल होलार समाजाचे अध्यक्ष मधुकर भंडगे, माजी उपनगराध्यक्ष विजय खवतोडे, ॲड. बापू मेटकरी, लक्ष्मण गायकवाड, पोपट पडवळे, बसपा शहराध्यक्ष किशोर कसबे, एनडीएमजेचे येताळ खरबडे, प्रकाश खंदारे, डी. के. साखरे, बाळासाहेब वाघमारे,
विठ्ठल सरवदे, संजय सरवदे, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव कसबे, नागेश ऐवळे, चन्नाप्पा भोरकडे, सुभाष आसबे, वसंत सरवदे, प्रसाद सरवदे, विनोद सरवदे, दत्ता सरवदे, हौलू सरवदे, विश्वास सरवदे, हरी वाघमारे, प्रदीप परकाळे, अनिल सोनवले, तुषार शेंबडे, गणेश धोत्रे, दादा मुजावर, शांतीलाल भोरकडे, उमेश केंगार, विलास भोरकडे, वसंत माने, अंकुश शेवडे, विक्रम शेंबडे, नेताजी अवघडे, सागर लोखंडे, खंडू घोडके, विकास जावळे, प्रशांत ढावरे, विनोद लोकरे, लखन शिकतोडे, दत्ता लांडगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.




