Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

mosami kewat by mosami kewat
July 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

बुलढाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. ऑनलाइन परीक्षा पद्धतीमुळे ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

निवेदनाद्वारे राज्य शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, समान संधी आणि तांत्रिक अडचणींमुळे होणारा विद्यार्थ्यांचा त्रास टाळण्यासाठी ऑफलाइन परीक्षा हा अधिक विश्वासार्ह पर्याय असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. (Offline MPSC Exam)

Also Read : मोशी कचरा डेपो दुर्घटना : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची गरज; दोषींवर कारवाई करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

या आंदोलनात धम्मगुरु भदंत राजज्योती, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोधर, तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, तालुका महासचिव बाळू मोरे, तालुका सचिव बंडू इंगळे, शहराध्यक्ष आकाश सरदार, प्रशिक उमाळे, माजी शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे, शाश्वत अकॅडमीचे संस्थापक सागर वाकोडे, सामाजिक कार्यकर्ते गजानन हिवराळे, गौतम सुरवाडे, रामेश्वर तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. (Offline MPSC Exam)

Tags: BuldhanaEducationExamMaharashtraMPSCOffline MPSC ExamPolitical
Previous Post

मोशी कचरा डेपो दुर्घटना : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची गरज; दोषींवर कारवाई करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!

Next Post
राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!

राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश
बातमी

जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

by mosami kewat
August 24, 2026
0

नांदेड : जयभीम नगर येथे मागील अनेक दिवसांपासून पाईपलाईन खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या समस्येची...

Read moreDetails
पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

August 24, 2026
पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 24, 2026
देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

August 24, 2026
Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार - राजेंद्र पातोडे

Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार – राजेंद्र पातोडे

August 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home