Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जलकुंभातील गळती तातडीने थांबवा, दूषित पाणीपुरवठा बंद करा; वंचित बहुजन आघाडीची आयुक्तांकडे मागणी

mosami kewat by mosami kewat
July 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जलकुंभातील गळती तातडीने थांबवा, दूषित पाणीपुरवठा बंद करा; वंचित बहुजन आघाडीची आयुक्तांकडे मागणी
       
नांदेड : नांदेड जिल्ह्यात पिवळी घिराणी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील जलकुंभामधून अनेक दिवसांपासून होत असलेल्या गळतीमुळे आणि नागरिकांना गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित जलकुंभाची अनेक वर्षांपासून सखोल साफसफाई करण्यात आलेली नाही.  नियमानुसार दर सहा महिन्यांनी जलकुंभाची स्वच्छता करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असून विविध साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.

वंचित बहुजन आघाडीने जलकुंभातील गळती तात्काळ बंद करून आवश्यक दुरुस्ती करावी, जलकुंभाची सखोल साफसफाई करून शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी ठाम मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. या मागण्यांवर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक ॲड. बिलास शेख, शुक्लोधन गायकवाड, स्थायी समिती सदस्य तथा वंचित बहुजन आघाडी युवकचे महानगर अध्यक्ष राहुल मधुकरराव सोनसळे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: MaharashtranandedPoliticalStop Water Tank LeakageWater tank Leak
Previous Post

भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात

Next Post

अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

Next Post
अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home